शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला आली जाग! न्यायालयीन लढ्यासाठी यापुढे मंत्र्यांची परवानगी अनिवार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 11:18 IST

पाच कोटींवर ३०० कोटींचे दिले व्याज

दीपक भातुसे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: एका कंत्राटदाराला पाच कोटी ७१ लाख रुपये अदा करण्याबाबत लवादाने दिलेल्या निर्णयाला शासकीय अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या न्यायालयात आव्हान दिल्याने लागलेल्या विलंबामुळे या मूळ रकमेवर तब्बल ३०० कोटी रुपयांचे व्याज सरकारला द्यावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. ‘लोकमत’ने ही बाब प्रकाशात आणली होती. त्यानंतर आता राज्य सरकारला जाग आली आहे.

काही अधिकाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयांमुळे आणि निविदेत टाकलेल्या चुकीच्या अटींमुळे राज्य सरकारला एवढा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यानंतर आता राज्य सरकारने अशा प्रकरणांबाबत एक परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार राज्य सरकारवर आर्थिक भार पडणाऱ्या प्रकरणांना न्यायालयात आव्हान द्यायचे असेल तर संबंधित खात्याच्या मंत्र्यांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. न्यायालयीन प्रकरणी शपथपत्र दाखल करण्यापूर्वी संबंधित मंत्र्यांच्या मान्यतेनेच शपथपत्र दाखल करावे, असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

कंत्राटदाराला द्यावी लागली होती भरपाई

  • खरे ॲण्ड तारकुंडे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला ऑक्टोबर १९९७ रोजी विदर्भातील एका रस्त्याचे काम देण्यात आले होते. २२६ कोटी रुपयांचे हे काम कंत्राटदाराने ऑक्टोबर १९९८ रोजी पूर्ण केले. टोलवसुली कालावधी पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराने ५ कोटी ७१ लाख रुपयांसाठी लवादाकडे धाव घेतली. लवादाने ४ मार्च २००४ रोजी ५ कोटी ७१ लाख रुपये आणि त्यावर २५ टक्के प्रती महिना चक्रवाढ पद्धतीने व्याजासह कंत्राटदाराला देण्याचे आदेश शासनाला दिले. 
  • त्यानंतर या आदेशाला आधी सत्र न्यायालय, नंतर उच्च आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. या कालावधीत ५ कोटी ७१ लाख आणि त्यावरील व्याज मिळून ३०० कोटी ४ लाख ६२ हजार रुपये संबंधित कंत्राटदाराला भरपाई देण्याची वेळ शासनावर आली.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रCourtन्यायालय