शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Police: मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द!
2
आजचे राशीभविष्य, ३१ ऑगस्ट २०२५ : आजचा दिवस शुभ फलदायी, धन लाभ होईल, मानसिक शांतता लाभेल !
3
शेकडो टॉयलेट, ११ टँकर, ४५० कर्मचारी; आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना
4
हलगीचा ताल, झांजेच्या झंकाराने निनादले रस, आंदोलकांचा नाचत जल्लोष 
5
Manoj Jarange: "...तर एकही मराठा घरी दिसणार नाही" जरांगे पाटलांचा इशारा
6
Uddhav Thackeray: सरकारने तुमच्या मागण्यांबाबत...; उद्धव ठाकरेंचा जरांगेंना फोन!
7
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
8
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
9
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
10
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
11
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
12
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
13
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
14
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
15
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
16
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
17
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
18
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
19
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
20
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू

विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 22:11 IST

एकनाथ शिंदे यांची 'सितारे जमीन पर' चित्रपटाच्या खास स्क्रीनिंगला हजेरी

विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन लागेल ते सर्व सहकार्य करायला तयार असून त्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर  काही निर्णय घ्यावा लागला तर तोही नक्की घेऊ असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या आमिर खान निर्मित 'सितारे जमीन पर' या सिनेमाचा विशेष खेळ आज आयनॉक्स सिनेमागृहात आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

यावेळी बोलताना त्यानी, विशेष मुलांच्या आयुष्यावर आधारित 'सितारे जमीन पर' हा सिनेमा तयार केला असून, त्यातून एक अत्यंत महत्त्वाचा सामाजिक प्रश्न अत्यंत संवेदनशीलतेने हाताळण्यात आला आहे. विशेष मुलांना देखील सर्वसामान्य मुलांसोबत त्याच शाळेत शिकता यावं याबाबत या सिनेमातून भाष्य करण्यात आले आहे. विशेष मुले ही इतर मुलांच्या तुलनेत अजिबात वेगळी नसून त्यांनाही इतर मुलांप्रमाणे सर्वसामान्य शाळेत शिकण्याचा तेवढाच अधिकार असल्याचे यावेळी बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले.

अभिनेते आणि निर्माते आमिर खान यांच्यासह दिग्दर्शक पी. एस. प्रसन्ना यांनाही हा विषय हाती घेऊन सिनेमा बनवल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच हा अवघड विषय तितक्याच तरलतेने मांडल्याबद्दल त्यांचे आभार मानले. शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी यांनी हा खेळ आयोजित करून शासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले आहे. देशात दिव्यांग मंत्रालय सुरू करणारे पहिले राज्य हे आपले महाराष्ट्र राज्य आहे. तसेच पालिका स्तरावर याबाबत काही निर्णय घ्यायचा असेल तर शासन त्यासाठी नक्की सहकार्य करेल असेही शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAamir Khanआमिर खानbollywoodबॉलिवूड