शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 06:26 IST

काही महिन्यांपूर्वीच एमएसआरडीसीने भरवीर ते इगतपुरी हा आणखी २५ किमीचा मार्ग सुरू केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: समृद्धी महामार्गावरून मुंबई ते नागपूर असा सलग प्रवास करणे आता शक्य होणार आहे. समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाण्यातील आमने हा शेवटचा ७६ किमी लांबीचा टप्पा येत्या ऑगस्टमध्ये वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नियोजन केले असून एका पुलाची उर्वरित कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यातील मार्गावर अभियांत्रिकीच्या दृष्टीने किचकट पूल आणि बोगद्यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत यातील बोगद्यांची आणि रस्त्यांचे कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मात्र ठाण्यातील खर्डी येथील एका जवळपास १.५ किमी लांबीच्या पुलाचे काम अद्याप बाकी आहे. प्रत्येक बाजूच्या वाहतुकीसाठी चार लेनचा हा पूल आहे. हा पूल ८२ मीटर उंच असून त्यावर गर्डर स्पॅन उभारण्याचे काम एमएसआरडीसीकडून सुरू आहे. हे काम अवघड असल्याने पुलाच्या उभारणीसाठी ऑक्टोबर उजाडणार आहे. मात्र त्याआधी ऑगस्टपर्यंत या पुलाची एक बाजू उभारण्याचे नियोजन एमएसआरडीसीने केले आहे. त्यानंतर पुलाच्या एका बाजूवरून दोन्ही दिशेची वाहतूक सुरू केली जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सद्यस्थितीत शेवटच्या टप्प्यातील ९७ टक्के कामे पूर्ण झाली आहेत.

समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा पहिला टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये सुरू करण्यात आला होता. तर दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते भरवीर असा जवळपास ८० किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता. काही महिन्यांपूर्वीच एमएसआरडीसीने भरवीर ते इगतपुरी हा आणखी २५ किमीचा मार्ग सुरू केला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नागपूरवरून निघालेली वाहने थेट इगतपुरीपर्यंत विनाअडथळा पोहचत आहेत.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गMSRDCराज्य रस्ते विकास महामंडळ