शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

बदल्यांमधील अर्थकारणाला आरोग्य विभागामध्ये चाप! राजपत्रित अधिकारी संघटनेने पत्रक काढत मानले मंत्र्यांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 09:37 IST

डॉ. सावंत यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, वर्ग १ ते ३ पर्यंतच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्राधान्यक्रम देऊन केल्या

मुंबई : सार्वजनिक आरोग्य खात्यात पारदर्शक बदल्या होतात, अर्थपूर्ण व्यवहार होत नाहीत असे कोणी सांगूनही खरे वाटणार नाही. पण या विभागाचे मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी ते करून दाखवले आहे. त्यासाठी आता राजपत्रित अधिकारी महासंघाने पत्रक काढून मंत्र्यांचे जाहीर काैतुक केले आहे. 

डॉ. सावंत यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, वर्ग १ ते ३ पर्यंतच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्राधान्यक्रम देऊन केल्या. बदली करण्यापूर्वी प्रत्येकाकडून प्राधान्यक्रम मागण्यात आला. दहा ठिकाणे सुचविण्याची मुभा देण्यात आली. सगळे काही ऑनलाइन होते. बदल्यांचे अधिकार मंत्री कार्यालयात एकवटण्याऐवजी खाली आयुक्तांना देण्यावर भर दिला गेला. ज्येष्ठतेचा निकषदेखील लावला. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दहा पर्याय दिले तरी बहुतेकांना  पहिल्या किंवा दुसऱ्या पर्यायाच्या ठिकाणीच बदली मिळाली.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना    १,०५५ वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी (वर्ग अ) ४०२ जणांना पहिल्या पसंतीचे ठिकाण मिळाले. १५७ ना दुसरे, ७६ ना तिसरे १४५ ना चौथे प्राधान्य ठिकाण मिळाले.     प्राधान्यक्रम न दिलेल्या अधिकाऱ्यांपैकी ११५ जणांना त्याच तालुक्यात, १०२ जणांना त्याच जिल्ह्यात, तर ५८ जणांना त्याच मंडळात बदली मिळाली.     वर्ग ब च्या अधिकाऱ्यांमध्ये १९४ पैकी ८७ जणांना पहिल्या पसंतीचे ठिकाण मिळाले. ३५ जणांना दुसरे, १७ जणांना तिसरे आणि २९ जणांना चौथे प्राधान्य ठिकाण मिळाले.     वर्ग अ मधील ७३ टक्के अधिकाऱ्यांना, तर वर्ग ब मधील ८६ टक्के अधिकाऱ्यांना पहिल्या पसंतीच्या ठिकाणी बदली मिळाली. 

बदल्यांसाठी बदनामी विकत घ्यायची नाही हा विचार समोर ठेवला आणि पारदर्शकता आणली. दरवर्षी याच पद्धतीने बदल्या केल्या जातील. - डॉ. तानाजी सावंत, सार्वजनिक आरोग्य मंत्री

बदल्यांसाठी एक स्वतंत्र सॉफ्टवेअरच तयार करण्यात आले. त्याद्वारे सर्व कार्यवाही करण्यात आली.- मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग

बदल्यांमधील गडबडींच्या टप्प्यातून सार्वजनिक आरोग्य विभागाची सुटका झाली याचे समाधान आहे. पारदर्शक बदल्यांमुळे अधिकारी अधिक चांगले काम करतील. मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे आभार मानावेत तितके कमीच.- डॉ. राजेश गायकवाड, अध्यक्ष

टॅग्स :Healthआरोग्य