शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र-कर्नाटकात डिझेल दरामध्ये आता काही पैशांचाच फरक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 17:16 IST

कर्नाटकाने केलेल्या दरवाढीचा परिणाम

जे. एस. शेखकागल : गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र - कर्नाटक सीमा भागात महामार्गालगत असलेल्या पेट्रोल व डिझेल पंपांवर कर्नाटक हद्दीत ‘महाराष्ट्र से सस्ता पेट्रोल - डिझेल’ असे फलक झळकत होते. मात्र, एप्रिल २०२५ पासून महाराष्ट्रातील डिझेलचे दर कमी झाल्याने ‘कर्नाटक से सस्ता डिझेल’ असे दर महाराष्ट्रातील पंपांवर झळकत आहेत.सध्या कर्नाटकपेक्षा महाराष्ट्रात डिझेल कागल - कोगनोळीजवळ फक्त ५९ पैसे इतके स्वस्त आहे, तर पेट्रोल कर्नाटकपेक्षा १ रुपया महाग आहे. लोकप्रिय आर्थिक योजनांच्या पूर्तीसाठी कर्नाटक सरकारने कर वाढवल्याने पेट्रोल पंपांवरील विक्रीचा टक्का घटल्याचा आरोप केला जात आहे.

महाराष्ट्र हद्दीतील पंपचालकांनी डिझेल दरामध्ये काही पैशांचाच फरक असल्याने विक्रीत फार फरक झाला नसल्याचे सांगितले. तसेच अनेक ट्रान्सपोर्ट कंपन्यांनी ठराविक पेट्रोल पंपांवर खाती उघडलेली असतात. त्यामुळे ते कमी-जास्त दराकडे फारसे लक्ष देत नाहीत, असे स्पष्ट केले.महाराष्ट्रातील दर स्थिरच..महाराष्ट्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केलेले नाहीत, तर कर्नाटक सरकारने गेल्या काही वर्षात हे दर वाढवत नेले आहेत. आठ वर्षांपूर्वी कर्नाटकात डिझेल दहा रुपयांनी स्वस्त होते. नंतर ते सात रुपये, पाच रुपये, दोन रुपये असे कमी होत गेले.डेपोमधील अंतरावर ठरतो दरमहाराष्ट्रातील डिझेल-पेट्रोलचा साठा मिरज येथे आहे, तर कर्नाटकात हा डेपो देसुर - बेळगाव येथे आहे. येथून पेट्रोल पंपापर्यंतच्या वाहतुकीच्या खर्चावर काही पैशांत हा दर कमी-जास्त होतो. उदाहरणार्थ कोगनोळीपेक्षा बेळगावात पेट्रोल एक रुपयांनी स्वस्त मिळते.ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्नसीमा भागातील या पेट्रोल - डिझेल पंपावर वाहनधारकांना विविध सेवासुविधा दिल्या जातात. यामध्ये डिस्काऊंट, बक्षीस कुपन, पाणी बाटली, काही भेटवस्तू यांचा समावेश आहे.

विक्री कमी-जास्तज्या पंपावर वाहनमालक व ट्रान्सपोर्ट कंपन्यांनी खाते उघडले आहे, तेथे दिवसाला पन्नास हजारहून अधिक डिझेल विक्री होते. ज्या पंपावर खाते नाही, तेथे ही विक्री दोन हजार लिटरपर्यंत होते.