शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

देशातील श्रीमंत बांधकाम व्यावसायिक शिंदे सरकारचे बनले मंत्री; भाजपानं दिली संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 11:15 IST

त्यात आज राज्याचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. त्यात भाजपाचे ९ आणि शिंदे गटाच्या ९ जणांना संधी देण्यात आली आहे.

मुंबई - गेल्या महिनाभरापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर मार्गी लागला आहे. ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर ३८ दिवस झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळे विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. महिनाभरात ६ हून अधिक वेळा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी झाली तरीही विस्तार होत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. 

त्यात आज राज्याचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. त्यात भाजपाचे ९ आणि शिंदे गटाच्या ९ जणांना संधी देण्यात आली आहे. भाजपाकडून देशातील श्रीमंत बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळखले जाणारे मंगलप्रभात लोढा यांना संधी देण्यात आली आहे. लोढा यांच्याकडे मुंबई भाजपा अध्यक्षपदाची धुरा होती. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पहिल्या टप्प्यात लोढा यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. 

कोण आहेत मंगलप्रभात लोढा?मंगलप्रभात लोढा हे स्वातंत्र्य सैनिक आणि निवृत्त न्यायाधीश गुमान माल लोढा यांचे सुपूत्र असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम सुरू केले. मलबार हिल मतदारसंघाचे ते भाजपा आमदार आहेत. १९९५ पासून सलग ते या मतदारसंघातून निवडून येत आहेत. देशातील नामवंत श्रीमंत बिल्डरांमध्ये लोढा यांचे नाव घेतले जाते. 

लोढा यांनी राजस्थानात एलएलबीचं शिक्षण घेतले. त्यानंतर वकिली सुरू केली. परंतु न्यायालयात वडील न्यायाधीश असल्याने त्यांनी वकिली सोडत थेट मुंबईत गाठली. याठिकाणी एका खासगी रिअल इस्टेटमध्ये नोकरी केली. ४ वर्ष फर्ममध्ये काम केल्यानंतर बिल्डिंगला लागणारं मटेरिअल पुरवण्याचं काम त्यांनी केले. १९८२ मध्ये एका मित्राच्या मदतीने नालासोपारा इथे जमीन खरेदीविक्रीचा व्यवसाय सुरू केला आणि याच व्यवसायात त्यांनी जम बसवला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून भाजपापर्यंत त्यांचा राजकीय प्रवास घडला. रथयात्रेवेळी त्यांना अटकही झाली होती. १९९५ मध्ये मलबार हिल मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली. तेव्हा तत्कालीन नगरविकास मंत्री बी.एस देसाई यांना हरवून ते जायंट किलर ठरले होते. 

टॅग्स :Mangalprabhat Lodhaमंगलप्रभात लोढाBJPभाजपाCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारEknath Shindeएकनाथ शिंदे