शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

ठेकेदाराने पैसे थकविले, विधानभवन परिसरात केला आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 07:15 IST

कंत्राटदारांनी पैसे थकवल्यामुळे कर्जबाजारी झाल्याने खोले यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मुंबई : कल्याण येथील रहिवासी महादेव खोले (४२) यांनी विधानभवन परिसरात विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कंत्राटदारांनी पैसे थकवल्यामुळे कर्जबाजारी झाल्याने खोले यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.तक्रारदार राकेश साळुंखे (३३) हे विधानभवन सुरक्षा या ठिकाणी प्रतिनियुक्तीवर कर्तव्यास आहेत. त्यांनी मरिन ड्राइव्ह पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, २७ जुलैला सायंकाळी ७.५० च्या सुमारास खोले यांनी त्यांच्याकडे विधानभवन आवारात जाण्याची परवानगी मागितिली. मात्र, पास नसल्याने साळुंखे यांनी खोलेंना परवानगी नाकारली. त्यामुळे खोले यांनी तिथेच बसकण मारून हातात असलेली पांढऱ्या रंगाची छोटी बाटली दाखवून ‘यातील औषध मी प्यायलो आहे,’ असे सांगितले. साळुंखे यांना संशय आला. त्यांनी त्याच्या हातातली बाटली व पिशवी काढून घेतली. उषा मेहता चौकातील मरिन ड्राइव्ह मोबाइल १ वरील सहकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यामुळे खोले यांना वेळीच उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल केले. 

खोले यांच्या पिशवीत सापडलेल्या कागदपत्रांत कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करीत असल्याची सुसाइड नोट पोलिसांना सापडली. दरम्यान, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खोलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  - डॉ. प्रवीण मुंडे, उपायुक्त, परिमंडळ १   

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनhospitalहॉस्पिटल