शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री प्रशासन चालवतील, फिरतीलही; चंद्रकांत पाटलांचा सुप्रिया सुळेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 06:15 IST

विश्वासघातामुळे आमचे सरकार आले नव्हते. आता आमचे सरकार आले. त्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले नाही असं मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

कल्याण : राज्यातील प्रशासन सध्या अतिशय व्यवस्थित सुरू आहे. तुम्ही तर घराच्या बाहेरच पडत नव्हता. त्यामुळे सुप्रियाताई म्हणाल्या, दोन-दोन मुख्यमंत्री पाहिजेत. एक प्रशासनाला आणि एक फिरायला. ताई, तुम्ही काळजी करू नका. हे सरकार पण चालवित आहेत, आणि फिरतात पण, असे असा टोला उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला आहे. 

कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवनदीप शैक्षणिक संस्थेतर्फे परिसरातील कीर्तनकारांचा जाहीर सत्कार शनिवारी करण्यात आला. याप्रसंगी भाजपचे आमदार किसन कथोरे, कुमार  आयलानी, माजी आमदार नरेंद्र पवार आणि जीवनदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पाटील म्हणाले की, आमची राज्यात अडीच वर्षे सत्ता नव्हती. विश्वासघातामुळे आमचे सरकार आले नव्हते. आता आमचे सरकार आले. त्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले नाही. जे घडायचे असते ते घडते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे झडपट निर्णय घेणारे आहेत. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी ज्या सामाजिक सुधारणेच्या गोष्टी केल्या. त्यांनी झटपट निर्णय घेऊन समाजाला न्याय दिला. त्याच धर्तीवर आमचे सरकार काम करीत आहे.

‘स्कील डेव्हलपमेंटवर भर द्या’पाटील पुढे म्हणाले, शिक्षणासोबत स्कील डेव्हलपमेंटवर जीवनदीप काॅलेजने  भर दिला पाहिजे. त्यासाठी आम्ही त्यांना निधी देऊ. अतिशय दुर्गम भागात संस्थेचे अध्यक्ष घोडविंदे यांनी शिक्षण संस्था उभी केली. या भागातील विद्यार्थ्यांची गरज पाहता या भागाला विधि महाविद्यालय (लॉ कॉलेज) दिले आहे. ग्रामीण भागात आर्ट्स, सायन्सचे शिक्षण घेऊन काय होणार नाही. ती एक समाजाची छोटी गरज आहे. या विषयांचे ज्ञान आणि त्याला स्कील डेव्हलपमेंटची जोड दिल्यास एका बाजूने तरुण बुद्धिमान होतील. तर दुसऱ्या बाजूने त्याला रोजगार मिळेल.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSupriya Suleसुप्रिया सुळे