शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
2
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
3
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार
4
खळबळजनक! T20 World Cup मध्ये मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, वेगवेगळ्या नंबरवरून आले फोन
5
फडणवीसांशिवाय मंत्रिमंडळात भाजप असणे अशक्य; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य
6
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे लोकार्पण कधी? उद्धव ठाकरेंनी केली बांधकामाची पाहणी
7
सुख-शांती हिरावून घेऊ शकतं स्मार्टफोनचं व्यसन; 'या' आजारांचा धोका, काय आहे Nomophobia?
8
पश्चिम बंगालमध्ये नवा ट्विस्ट! CM ममता बॅनर्जी भाजपा खासदाराच्या घरी; चर्चांना उधाण
9
"पप्पा फक्त एकदा परत या आणि..."; शहीद वडिलांना आजही व्हॉईस मेसेज पाठवतो ७ वर्षांचा लेक
10
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ जुलैला मतदान आणि निकाल लागणार
11
'भाजपशासित राज्ये पेपरफुटीची केंद्रे बनली', NEET परीक्षेतील गोंधळावरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Paras Defence And Space Technologies : एका दिवसात २० टक्क्यांचे रिटर्न; 'या' स्मॉलकॅप डिफेन्स कंपनीचे शेअर्स का बनलेत रॉकेट?
13
'मला न्याय द्या...', स्वाती मालीवाल यांचे शरद पवार, राहुल गांधींना पत्र; भेटीची वेळ मागितली!
14
वयानुसार किती वेळ आणि कोणता प्रकारचा करावा व्यायाम?; WHO ने दिल्या गाइडलाईन्स
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; आता 'या' खात्याची मिळाली जबाबदारी
16
"मी तर वारकऱ्यांमध्ये गेलो होतो पण..."; कार्यकर्त्याने पाय धुतल्यावर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण
17
लोकसभेनंतर विधानसभेतही अजित पवारांना धोबीपछाड?; शरद पवारांकडून बारामतीत मोर्चेबांधणी
18
Godawari Power and Ispat shares : अधिक पैसे देऊन आपलेच शेअर खरेदी करणार 'ही' कंपनी, वृत्तानंतर गुंतवणूकदाराच्या शेअरवर उड्या
19
VIDEO: "हा काय भारत नाही"; चाहत्याला मारण्यासाठी धावला हारिस रौफ; रस्त्यातच मोठा गोंधळ
20
जीम ट्रेनरच्या प्रेमात अडकली, पतीच्या हत्येची सुपारी दिली; प्लॅन A फसला, त्यानंतर...

मुख्यमंत्री नेमणार सल्लागार समिती, दर पंधरा दिवसांनी घेणार आढावा बैठक

By महेश चेमटे | Published: September 08, 2022 11:54 AM

राज्य कारभार चालवताना मुख्यमंत्री प्रशासनातील विविध खात्यांच्या सचिवांचा सल्ला घेत असतात.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेली राज्य सल्लागार समिती नियुक्त करणार आहेत. ही समिती मुख्यमंत्र्यांना विविध क्षेत्रातील विकासासाठी सल्ला देण्याचे काम करेल. दर १५ दिवसांनी  समितीची बैठक घेऊन मुख्यमंत्री राज्याच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत. राज्य कारभार चालवताना मुख्यमंत्री प्रशासनातील विविध खात्यांच्या सचिवांचा सल्ला घेत असतात. नव्या योजना, विकास प्रकल्पांची आखणी करताना हे सचिव मुख्यमंत्र्यांना सल्ला देतात. काही बाबतीत खासगी संस्थांकडूनही सल्ला घेतला जातो. मात्र, मुख्यमंत्री आता राज्य सल्लागार समितीच स्थापन करणार असून त्यात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश केला जाणार आहे.  हे तज्ज्ञ मुख्यमंत्र्यांना संबंधित क्षेत्रात राज्य आघाडीवर कसे जाईल, याबाबत सल्ला देतील.

आरोग्य, शिक्षण, कृषी क्षेत्रावर भर - शिंदे गट - भाजप युती सरकारचा मुख्य फोकस हा आरोग्य, शिक्षण आणि कृषी क्षेत्रावर असणार आहे. त्यासाठी या क्षेत्रातील विशेष तज्ज्ञ राज्य सल्लागार समितीमध्ये नियुक्त केले जाणार आहेत. - त्यांच्या सल्ल्याने या क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याचा या सरकारचा प्रयत्न असणार आहे. राज्यात रोजगार कसा वाढवायचा, कोणत्या विकासाच्या योजना राबवायच्या, याचा सल्लाही ही समिती मुख्यमंत्र्यांना देणार आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना