शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 07:02 IST

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर विरोधकांकडून आरोपांच्या फैरी सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही बाब गांभीर्याने घेतली आहे.

मुंबई : विधान परिषदेत कामकाज सुरू असताना रमी खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर विरोधकांकडून आरोपांच्या फैरी सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही बाब गांभीर्याने घेतली आहे. ‘मी रमी खेळत नव्हतो, अचानक जाहिरात पॉपअप झाली’, असे त्यांनी सांगितले असले तरी जे घडले ते भूषणावह नाही, या शब्दात त्यांनी कोकाटेंना सुनावले आहे.विधिमंडळात जेव्हा चर्चा चालते तेव्हा आपले कामकाज नसले तरीही आपण गांभीर्याने बसणे गरजेचे आहे. एखाद्या वेळेस तुम्ही कागदपत्रे वाचता; पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हे निश्चितच योग्य नाही, हे अतिशय चुकीचे आहे, अशा कडक शब्दात फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे.कोकाटेंच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवार घेणार : तटकरेसाेलापूर : कृषिमंत्री काेकाटे यांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत, असे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी साेमवारी सांगितले.

मागाल तेवढे पुरावे देतो, विरोधकांचा हल्लाबोलविधिमंडळाचे कामकाज सुरू असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे जंगली रमी खेळत होते त्याचे आणखी किती पुरावे हवेत ते सांगा, मागाल तेवढे पुरावे देतो, असे आव्हान शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. आव्हाड यांनी कोकाटेंचे दोन व्हिडिओ एक्सवर पोस्ट करताना म्हटले आहे की, आता मी दोन व्हिडिओ देतोय. दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा... कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला आहे, हे दिसेल. कोकाटे हे ऑनलाइन जुगाराचे पत्ते बोटाने सरकवत आहेत.

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र