शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी मला ९०० खोके दिले; सरनाईक यांची विरोधकांना कोपरखळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 08:04 IST

ओवळा-माजिवडा या आ. सरनाईक यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी राज्य शासनाकडून १८०० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये ठाण्यासाठी ९०० तर मीरा-भाईंदरसाठी ९०० कोटी देण्यात आले आहेत.

ठाणे : मुख्यमंत्र्यांनी मला ९०० खोके दिले आहेत, पण ते विकासकामांसाठी दिले असल्याची कोपरखळी शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विरोधकांना लगावली. हे ९०० कोटी माझ्या ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील प्रस्तावित विकासकामांसाठी दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात सर्वाधिक निधी माझ्या मतदारसंघात दिला असून विकासाची दूरदृष्टी असलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.                        ओवळा-माजिवडा या आ. सरनाईक यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी राज्य शासनाकडून १८०० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये ठाण्यासाठी ९०० तर मीरा-भाईंदरसाठी ९०० कोटी देण्यात आले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या विकासकांच्या संदर्भात आ. सरनाईक यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन या सर्व महत्त्वाच्या प्रकल्पांना चालना देण्याची मागणी  केली. पालिका आयुक्तांनीही या प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 

मध्यावधी निवडणुकीची शक्यता नाहीखासदार  संजय राऊत यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकीची व्यक्त केलेली शक्यता सरनाईक यांनी खोडून काढली. सरकार चांगले काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. सरकार स्थापन होत असताना गुवाहाटीच्या कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. त्याच देवीच्या दर्शनासाठी पुन्हा जाणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. 

कारवाई न्यायालयाच्या निर्देशानुसारईडीच्या कारवाईबाबत पूर्वेतिहास तपासून घेणे आवश्यक असून दोन फ्लॅट आणि एक भूखंड जप्तीची कारवाई नायालयाच्या निर्णयानुसार होत असून यात कोणत्याही पक्षाचा संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत सरनाईक यांना छेडले असता यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील, असे सांगितले. यापूर्वी मागून मिळत नव्हते मात्र आता न मागता मिळत असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकEknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणे