मुंबई : २०२५ या नवीन वर्षात कॅलेंडर बदलणार आहे. त्याप्रमाणे महायुती सरकारच्या काळातील काही गोष्टी बदलतील का, असा सवाल उद्धवसेनेने सरकारला केला आहे, नव्या वर्षाची सुरुवात होण्यापूर्वीच उद्धवसेनेने महायुती सरकारला राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि महिलांवरील अत्याचार थांबतील का? कायदा-सुव्यवस्था अबाधित राखली जाईल का? महागाई कमी होईल का? तरुणांना रोजगार मिळेल का? तसेच, महाराष्ट्र आणि मुंबईची लूट थांबेल का? असे प्रश्न विचारले.
महायुती सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी अंगणवाडी, आशा सेविका, मदतनीस यांना महिलांचे फॉर्म भरून घेण्यासाठी प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा केली होती. मात्र, सरकारने त्यांना भत्ता अजूनही दिला नाही. या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सरकारच्या लाडक्या नाहीत का? असा सवालही उद्धवसेनेने केला आहे.