शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळ तर ठरलं, पण खातेवाटप कधी? खुद्द उपमुख्यमंत्री अजित दादांनीच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 20:55 IST

आता राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे ते खातेवाटपाकडे. कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार याकडे. तर मंत्र्यांचे खाते वाटप केव्हा होणार यासंदर्भात खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा यांनीच माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज पार पडला. नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यात महायुतीच्या एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यानंतर आता राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे ते खातेवाटपाकडे. कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार याकडे. तर मंत्र्यांचे खाते वाटप केव्हा होणार यासंदर्भात खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा यांनीच माहिती दिली आहे. ते मंत्रीमंडळ विस्तारानंतर, महायुतीच्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.

केव्हा होणार खातेवाटप..?अजित पवार म्हणाले, "आपल्या सर्वांना माहित आहे की कालच्या २३ तारखेला राज्यात प्रचंड बहुमताने युतीचे सरकार आले. यानंतर, आज मंत्रिमंडळाच्या शपथविधीने त्याला खऱ्या अर्थाने अंतिम स्वरूप प्राप्त झाले आहे. दोन-तीन दिवसात मुख्यमंत्री महोदय सर्वांचे खातेवाटप करतील आणि कामाला गती आल्याचे हे आपण सर्वांना बघायला मिळेल." तसेच, "आमचा प्रयत्न आहे की, एवढे मोठे बहुमत असल्यामुळे जनतेने महायुतीवर जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला पात्र राहून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कशा प्रकारे करता येईल? हाच प्रयत्न आम्ही सर्व करणार आहोत," असेही अजित पवार म्हणाले.

चहापानावरही केलं भाष्य -विरोधकांच्या चहापानावरील बहिष्कारासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, "हिवाळी अधिवेशनानिमित्त आज आम्ही सर्वजण नागपुरात आलो आहोत. कॅबिनेट आत्ताच झाली. यावेळी सभागृहात कोणती बिले येणार आहेत, त्याविषयी राज्याचे मुख्यमंत्री सांगतीलच. साधारण कामकाज कसे असेल यासंदर्भात. परंतु, अलीकडे एक पायंडाच पडला आहे की, विरोधी पक्ष सातत्याने चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालतो. अलिकडे वर्षानुवर्षे सुरी आहे. त्यामुळे चहापान करावे, करू नये, हा विचार करण्याजोगा प्रश्न निर्माण झाला आहे."  

 

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे