शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

मुख्याध्यापक, शिक्षकांवरील भार झाला कमी : शालेय कामकाजासाठी मिळणार अधिक वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 09:03 IST

शिक्षकांचा बराच वेळ समितीचे कामकाज करण्यात जात हाेता. विविध समित्यांचे एकत्रीकरण करून समित्यांची संख्या आता चारच केली आहे. 

यवतमाळ : शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था शाळेत तब्बल १५ समित्या हाेत्या. काही समित्यांचे कामकाज आणि शाळा समितींकडे असलेले कामकाज यांच्यात समानता आढळून आली. समित्यांमुळे शिक्षक व मुख्याध्यापकांना अधिक काम करावे लागत हाेते. हा भार कमी करण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून हाेत हाेती. अखेर शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला. यामुळे आता केवळ चार समित्या राहणार आहे.

शाळास्तरावर शाळा व्यवस्थापन समिती, परिवहन समिती, मातापालक संघ, शालेय पाेषण आहार याेजना समिती, पालकशिक्षक संघ, शाळा बांधकाम समिती, तक्रार पेटी समिती, सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, नवभारत साक्षरता समिती, तंबाखू सनियंत्रण समिती, शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समिती, स्वयंमूल्यांकन समितीचा समावेश हाेता. शिक्षकांचा बराच वेळ समितीचे कामकाज करण्यात जात हाेता. विविध समित्यांचे एकत्रीकरण करून समित्यांची संख्या आता चारच केली आहे. 

शाळा व्यवस्थापन समितीची रचना राहणार अशीशाळा व्यवस्थापन समिती सदस्य व सचिव वगळून १२ ते १६ लाेकांची राहणार आहे. यात ७५ टक्के सदस्य पालक राहतील. पदसिद्ध सदस्य सचिव मुख्याध्यापक राहतील. एकूण सदस्यांपैकी ५० टक्के सदस्य महिला राहतील. समिती दर दाेन वर्षांनी पुनर्गठित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

खासगी शाळांसाठी स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित होणार आहे. याचप्रमाणे अशैक्षणिक आणि दैनंदिन अध्यापनावर परिणाम करणाऱ्या ऑनलाइन कामाच्या संबंधाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आहे. - विजय कोंबे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती