शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

तारपा वाद्य, वारली चित्रकलेने ब्रिटिश भारावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:04 IST

वारली चित्र, तारपा वाद्य आणि इतर कलात्मक वस्तूंचे भरभरून कौतुक केले.

पालघर: वारली चित्र, तारपा वाद्य आणि इतर कलात्मक वस्तूंचे भरभरून कौतुक केले तसेच त्याची वैशिष्ट्यपूर्ण माहिती घेण्यात मग्न दिसल्या त्या ब्रिटिश महिला. निमित्त होते ते लोककलाकारांच्या कलांना प्रोत्साहन देण्यासाठी लंडनमध्ये भरलेल्या विशेष प्रदर्शनाचे. लोककला, लोकवाद्ये आणि वारली चित्रशैलीचे जतन करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोत्साहनपर उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत पालघर जिल्ह्यातील वारली चित्रकार रमेश हेंगडी यांनी लंडनमध्ये आपल्या वारली चित्रांचे प्रदर्शन भरविले होते. त्याला लंडनवासीयांनी प्रतिसाद दिला.

सांस्कृतिक दौऱ्यात कलेचे कौतुककोलकाता, गोवा येथील प्रमुख उत्सवांमध्ये वारली कलाकारांनी कला सादर केल्यानंतर पालघरमधील रमेश हेंगडी यांनी नुकताच लंडनमध्ये ११ दिवसांचा सांस्कृतिक दौरा केला. तिथे त्यांनी आपल्या वारली चित्रांचे प्रदर्शन भरविले होते. यावेळी अनेक ब्रिटिश नागरिकांनी हेंगडी यांच्या स्टॉलला भेट देऊन त्यांच्या कलेचे कौतुक केले. त्याबाबत माहिती जाणून घेतली. 

लोककलांचे जतन  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने व बांगला नाटक डॉट कॉमच्या पुढाकाराने ऑक्टोबर २०२४ पासून पालघर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये लोककलांचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लोककलांच्या जतनाबरोबरच स्थानिक पर्यटनाला चालना देण्याचाही पर्यटक विकास महामंडळाचा हेतू होता. ‘बांगला डॉट कॉम’ने आतापर्यंत ४०० कलाकारांना लोककला, हस्तकला, वारली चित्रकला जगाच्या व्यासपीठावर नेण्यासाठी कार्यशाळा घेतल्या. पालघरमध्ये डहाणू आणि तलासरी तालुका, नाशिकमध्ये सुरगाणा तालुक्यात हे उपक्रम राबवतात. यात वारली चित्रकला, बोहाडा मुखवटा , बांबू हस्तकला आणि तारपा, कांबडे, होडी यांसारख्या लोककला, संगीत प्रकारांचे जतन, प्रोत्साहन यांचा समावेश आहे.

टॅग्स :palgharपालघरInternationalआंतरराष्ट्रीयMaharashtraमहाराष्ट्र