शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

धनुष्यबाण चिन्ह यंदा काही ठाकरेंच्या हाती नाही; आता पुढील वर्षी सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 07:12 IST

ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर केली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खासदार अनिल देसाई उपस्थित होते. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीने कुणीही हजर नव्हते.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : धनुष्यबाण कोणाचा यावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आता पुढील वर्षी म्हणजेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे गटाने दावा सांगितला आहे. याची सुनावणी मुख्य निवडणूक आयुक्तांसमोर सुरू आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीत केवळ पाच ते सात मिनिटांत दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आयुक्तांनी सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलली आहे. 

ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर केली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खासदार अनिल देसाई उपस्थित होते. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीने कुणीही हजर नव्हते. दोन्ही गटांकडून आयोगात वकिलांची फौज हजर होती. कोणत्या पक्षाने किती सदस्यांची माहिती सादर केली आहे, किती कागदपत्रे दिली आहेत याबद्दल पुढील सुनावणीमध्ये चर्चा होणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. 

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने १५ लाखांपेक्षा जास्त प्राथमिक सदस्यांचे पत्र, तीन लाखाच्या जवळपास शपथपत्र आयोगात सादर केली आहेत. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने ७ लाख सदस्यांची नावे दिली आहेत. ठाकरे गटाने शिंदे गटापेक्षा दुप्पट सदस्यांची यादी दिली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय