शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-शिवसेनेतील अंतर आमच्यासाठी शुभसंकेत होते; शरद पवारांच्या आत्मचरित्रात दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 08:03 IST

विधानसभा निवडणुकीत शिवसेना १७१ आणि भाजप ११७ जागा असे जागा वाटप ठरलेले होते. मात्र, २०१९ मध्ये शिवसेनेने १२४ आणि भाजपने १६४ जागा लढविल्या.

मुंबई - भाजप आणि शिवसेनेत २०१९ साली वाढलेले अंतर आमच्यासाठी शुभसंकेत होता, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागात महाविकास आघाडी स्थापनेबाबत लिहिताना केला आहे. भाजपला वर्चस्वासाठी राज्यातून शिवसेनेचे उच्चाटन करायचे होते, असेही त्यांनी या पुस्तकात नमूद केले आहे. २ मे रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.     

विधानसभा निवडणुकीत शिवसेना १७१ आणि भाजप ११७ जागा असे जागा वाटप ठरलेले होते. मात्र, २०१९ मध्ये शिवसेनेने १२४ आणि भाजपने १६४ जागा लढविल्या. स्वत:च्या बळावर बहुमत मिळवत शिवसेनेचे ओझे उतरवून ठेवायचे, असा चंग भाजपने बांधला होता. ५० मतदारसंघांत शिवसेना उमेदवारांसमोर भाजपचे बंडखोर होते. त्यातील बहुतेक भाजप नेत्यांच्या आशीर्वादाने उभे होते, असा दावाही पुस्तकात आहे. २०१५ नंतरच्या राजकीय परिस्थितीवर पवारांनी भाष्य केले आहे. 

शिवसेनेच्या उच्चाटनाचे भाजपचे होते लक्ष्य  शिवसेनेची ताकद असलेल्या शहरी भागात तिचे उच्चाटन केल्याशिवाय आपल्याला राज्यात वर्चस्व स्थापन करत येणार नाही, असा सरळ राजकीय हिशेब भाजपचा होता. याचमुळे आपल्या राजकीय अस्तित्वावर भाजप उठला आहे, या विषयी शिवसेना नेतृत्व आणि त्यांच्या कार्यकर्त्यांत तीव्र संताप होता. सत्तेत एकत्र असल्याने त्याचा उद्रेक झाला नाही. पण आग धुमसत होती, असे पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारShiv SenaशिवसेनाBJPभाजपा