शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील हवाई मार्गांना मिळणार बळ; १८ फेब्रुवारीपासून विमानसेवा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 05:23 IST

पुणे-शिर्डी-नागपूर, पुणे-औरंगाबाद-नागपूर विमानसेवा लवकरच

मुंबई : राज्यातील विमानतळांच्या समस्या सोडवून हवाई मार्गांना बळ देण्यासाठी प्रयत्नशील असून, चालूवर्षात काही मार्गिका खुल्या केल्या जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी दिली. यावर्षी नोव्हेंबरमध्ये अमरावती विमानतळावरून उड्डाणे सुरू होतील, तर पुणे-शिर्डी-नागपूर विमानसेवा १८ फेब्रुवारी आणि पुणे-औरंगाबाद-नागपूर विमानसेवा १ मार्चपासून सुरू केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील विमानतळांचा विकास आणि नवीन सेवा सुरू करण्यासंदर्भात महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कपूर यांची भेट घेतली. यावेळी उत्तर महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र येथील शेतमालास बाजारपेठ मिळण्यासाठी जिल्हास्तरीय मालवाहतूक विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली गेली. 

अमरावती विमानतळासाठी अतिरिक्त निधीअमरावती विमानतळासाठी केंद्र सरकारकडून ५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून पहिल्या टप्प्यातील ६.५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. राज्य शासनाकडूनही या विमानतळासाठी अतिरिक्त २३ कोटी मिळणार आहेत. कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या मदतीतून येत्या तीन ते चार महिन्यात ६४ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती दीपक कपूर यांनी शिष्टमंडळाला दिली.

कोणते विमानतळ कधी सुरू होणार? नोव्हेंबर २०२२ पासून अमरावती विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू करण्यात येईल. पुणे-शिर्डी-नागपूर मार्गावर अलाइन्स एअर १८ फेब्रुवारीपासून सेवा सुरू करेल, तर पुणे-औरंगाबाद-नागपूर सेवा १ मार्चपासून सुरू केली जाणार असल्याची माहिती दीपक कपूर यांनी दिली.

विमानतळ विकास प्राधिकरण व महाराष्ट्र चेंबरतर्फे जिल्हास्तरावर प्रशिक्षण केंद्र उभारून स्थानिक युवकांना विमानसेवेशी निगडित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी गांधी यांनी दिली. चेंबरच्या नागरी विमानोड्डाण समितीचे सुनीत कोठारी यांनी, विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनांच्या इंधनाच्या मूल्यवर्धित करात कपात करून तो एक टक्का करावा, असे सुचविले.

टॅग्स :airplaneविमान