शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'५० खोक्यांचा आरोप करणाऱ्यांनी आमच्याकडेच ५० कोटी मागितले', तो प्रसंग सांगत शिंदेंकडून ठाकरेंची कोंंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 23:22 IST

Eknath Shinde Criticize Uddhav Thackeray: आज मुंबईतील आझाद मैदानात झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी एकनाथ शिंदें यांनी ५० खोके एकदम ओके म्हणत टीका करणाऱ्या ठाकरे गटावर एक सनसनाटी आरोप केला.

आज मुंबईतील आझाद मैदानात झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी एकनाथ शिंदें यांनी ५० खोके एकदम ओके म्हणत टीका करणाऱ्या ठाकरे गटावर एक सनसनाटी आरोप केला. तसेच शिवसेनेत दोन गट झाल्यावर आमच्यावर ५० खोके घेतल्याचा आरोप करणाऱ्यांनी आमच्याकडेच ५० कोटी रुपये मागितले होते, असा दावा केला. 

एकनाथ शिंदे म्हणाले की, रक्तांच नातं सांगणाऱ्यांनीच बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटला. यांची बांधिलकी फक्त आणि फक्त पैशांशी, विचारांशी नाही.  यांनी कुठलीही सीमा ठेवली नाही. यांनी निर्लज्जपणेचे सगळे कळस गाठले.  निवडणूक आयोगाने आपल्याला शिवसेना आणि धनुष्यबाण अधिकृतपणे दिल्यानंतर  यांनी शिवसेनेच्या खात्यातील ५० कोटी रुपये बँकेकडे मागितले. बँकेने नकार दिला. बँकेने सांगितले की, निवडणूक आयोगाने शिवसेना अधिकृतपणे  शिंदेंना दिली आहे. त्यामुळे ५० कोटी रुपये देता येणार नाही. मग यांनी निर्लज्जपणे पत्र आपल्याकडे पाठवले. तुम्ही आमच्यावर ५० खोक्यांचे आरोप करता आणि ५० खोके आमच्याकडेच मागता. या एकनाथ शिंदेने क्षणाचाही विलंब न लावता ५० कोटी द्यायला सांगितले. मी सांगितलं यांचं प्रेम फक्त पैशांवर आहे. बाळासाहेबांच्या विचारांवर नाही. पण मी त्यांना खोके आणि बोके म्हणणार नाही कारण खोके त्यांना पुरत नाहीत. त्यांना जवळून ओळखणारे सांगतात की त्यांना खोके नाही तर कंटेनर लागतात, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. 

दरम्यान, आज उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठं विधान केलं आहे.शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत मी मराठा समाजासाठी लढणार. इतर कुणावरही अन्याय न करता. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने त्यांची शपथ घेऊन सांगतो की, सर्वांना न्याय मिळवून देईन, असे विधान एकनाथ शिंदे यांनी व्यासपीठावरील शिवछत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करून सांगितले.   

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना