शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत कालदर्शिका’ पंचांगाचे थाटात प्रकाशन

By admin | Updated: November 25, 2014 00:51 IST

अध्यात्म, आरोग्य, वास्तू, करिअर, पाककृती, सौंदर्याच्या साहित्यांसह तिथी, पंचांग, मुहूर्त, राशी भविष्य, संकष्टी चतुर्थी आदींच्या इत्यंभू माहितीचा लेखाजोखा मांडणारे ‘लोकमत कालदर्शिका’

महाराष्ट्रात सर्वाधिक विक्रीचा विश्वास : मान्यवरांची प्रतिक्रियानागपूर : अध्यात्म, आरोग्य, वास्तू, करिअर, पाककृती, सौंदर्याच्या साहित्यांसह तिथी, पंचांग, मुहूर्त, राशी भविष्य, संकष्टी चतुर्थी आदींच्या इत्यंभू माहितीचा लेखाजोखा मांडणारे ‘लोकमत कालदर्शिका’ या वार्षिक पंचांगाचे उद्घाटन लोकमान्य बुक डेपोचे (कर्मवीर बुक डेपो) संचालक मधुसूदन बिंझाणी, एस.जी. उन्हाळे अ‍ॅण्ड कंपनीचे संचालक गिरीश उन्हाळे आणि लोकमतचे समन्वयक संपादक कमलाकर धारप यांच्या हस्ते सोमवारी लोकमत भवनात थाटात झाले. ही कालदर्शिका संपूर्ण महाराष्ट्रात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. मधुसूदन बिंझाणी यांनी सांगितले की, गुणवत्ता, त्यातील घटक, सजावट आणि ब्रॅण्डनेम हे कालदर्शिकेचे मुख्य आकर्षण आहे. किंमत २४ रुपये असून सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहे. कुणीही खरेदी करून भिंतीवर लावावे, असे आकर्षण या कॅलेन्डरमध्ये आहे. अन्यच्या तुलनेत या कालदर्शिकेची बाजारात सर्वाधिक विक्री होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विदर्भात २० लाखांपेक्षा जास्त मराठी तिथीचे कॅलेन्डर विकले जातात. त्यात सर्वाधिक वाटा लोकमत कालदर्शिकेचा राहील. गिरीश उन्हाळे यांनी सांगितले की, लोकमतने ‘ग्रीप’ धरली आहे. कालदर्शिकेची महती लोकांना कळली असून सध्या मागणी वाढली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात लोकमत आघाडीचा ब्रॅण्ड असून लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हेच बिरुद कालदर्शिकेशी जुळल्याने प्रत्येकाच्या घरात हेच पंचांग राहील.लोकमत कालदर्शिकेत राशिचक्रकार शरद उपाध्ये यांनी ‘भोंदू गुरू आणि फसवे ज्योतिषी’ या विषयावर मत मांडले आहे. हृदयरोग टाळता येऊ शकतो, यावर डॉ. रमकांत पांडा, जीवनशैली बदला, मधुमेह टाळा, यावर डॉ. व्यंकटेश शिवणे, प्राचीन वास्तूशास्त्रावर डॉ. रविराज अहिरराव, सौंदर्य साधनेवर शुभांगी लाटकर, ‘क’ करिअरचा, यावर शेखर कुंटे, पर्जन्य अंदाज, अधिकमास, विज्ञान, महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आणि शेतीच्या विकासावर भय्यूजी महाराजांनी विचार मांडले आहे. प्रकाशनप्रसंगी लोकमतचे उपमहाव्यवस्थापक (वितरण, पूर्व महाराष्ट्र) संतोष चिपडा, वरिष्ठ वितरण व्यवस्थापक मुश्ताक शेख आदी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)