शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

'यामुळे' फडणवीसांना किंमत मोजावी लागली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 11:12 IST

विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अनेकदा चकमक झाली होती. फडणवीसांनी पवारांवर तीव्र शब्दांत टीका केली होती. परंतु, निवडणुकीत पवारच भारी ठरले. पवारांनी अनुभवाच्या जोरावर फडणवीसांना विरोधीपक्षात बसायला भाग पाडले ही वस्तुस्थिती आहे. 

मुंबई - ‘मी पुन्हा येईन’, असे सगळेच म्हणत असतात, त्यात गैर काहीच नाही, मात्र हे म्हणत असताना देवेंद्र फडणवीस यांनी काही विधाने केली. निवडणुकीच्या काळातील त्यांच्या भाषणांमध्ये मी पणाचा दर्प होता, त्याची त्यांना किंमत मोजावी लागली, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. 

मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन यावर शरद पवारांना विचारण्यात आले. त्यावर पवार म्हणाले, तुम्हाला लोकांचा पाठिंबा असेल तर त्या पाठिंब्याचा उपयोग आपल्या संघटन वाढीसाठी करून घ्यावा. मात्र त्यात मी पणाचा दर्प असू नये. शेवटच्या प्रचारसभांमधील फडणवीसांच्या भाषणांमधून सत्तेचा दर्प येत होता, असं पवार यांनी सांगितले. 

शरद पवार हे इतिहास जमा झालेलं नाव असून आता माझ नाव आहे. त्यांच्या बोलण्यात सत्तेचा दर्प होता. मी म्हणजे सर्वकाही आणि बाकीचे तुच्छ, अशा प्रकारची भूमिका त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला.  महाराष्ट्रातील जनतेला हे आवडत नाही. लोकांना विनम्रता आवडते. ते पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री झाले.  त्याआधी महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीसांचे वेगळं स्थान नव्हतं. नागपूरचे महापौर असतील, तिथे त्यांच योगदान असेल. विधानसभेत त्यांच योगदान ही त्यांच्यासाठी जमेची बाजू होती. मात्र मी म्हणजे महाराष्ट्र असं समजल्याने त्यांना किंमत मोजावी लागल्याचे पवारांनी नमूद केले. 

विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अनेकदा चकमक झाली होती. फडणवीसांनी पवारांवर तीव्र शब्दांत टीका केली होती. परंतु, निवडणुकीत पवारच भारी ठरले. पवारांनी अनुभवाच्या जोरावर फडणवीसांना विरोधीपक्षात बसायला भाग पाडले ही वस्तुस्थिती आहे.