...म्हणून अमेरिका हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन बनवत नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 08:35 PM2020-04-11T20:35:43+5:302020-04-11T20:41:30+5:30

भारतीय कायद्यानुसार औषधाचे कोणतेही पेटंट नसून त्याच्या निर्मिती प्रक्रियेचे पेटंट दिले जाते. त्यामुळे या कायदेशीर तरतुदीनुसार भारतीय कंपन्या जगातल्या अनेक आजारांवरील औषधे कमी किंमतीत उपलब्ध करून देऊ शकतात. याच कारणामुळे  हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे अशी प्रतिक्रियाऔषध निर्मिती प्रक्रियेचे अभ्यासक डॉ सदानंद बोरसे यांनी दिली. 

... thats why America does not make hydroxychloroquine | ...म्हणून अमेरिका हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन बनवत नाही 

...म्हणून अमेरिका हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन बनवत नाही 

Next

पुणे : भारतीय कायद्यानुसार औषधाचे कोणतेही पेटंट नसून त्याच्या निर्मिती प्रक्रियेचे पेटंट दिले जाते. त्यामुळे या कायदेशीर तरतुदीनुसार भारतीय कंपन्या जगातल्या अनेक आजारांवरील औषधे कमी किंमतीत उपलब्ध करून देऊ शकतात. याच कारणामुळे  हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे अशी प्रतिक्रियाऔषध निर्मिती प्रक्रियेचे अभ्यासक डॉ सदानंद बोरसे यांनी दिली. 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभर त्यावर निर्णायक उपाययोजना तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातही त्यावर लस तयार करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ अभ्यासात गुंतले आहेत. मात्र हे सुरु असताना अमेरिकेने भारतासारख्या विकसनशील देशाकडे केलेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाच्या मागणीमुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला तोंड फुटले आहे. बलाढ्य अमेरिका स्वतःच हे औषध का बनवत नाही या मुद्दयावर सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. याच विषयावर डॉ बोरसे यांनी लोकमत'शी संवाद साधला. 

ते म्हणाले की, 'अमेरिकेतील औषध कंपन्या व्यापारी तत्वाला डोळ्यासमोर ठेवून काम करतात. भारतातील औषध निर्मिती कंपन्यांप्रमाणे मानवता, गरजू रुग्णांना मदत या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी नफ्यानंतर येणाऱ्या या दुय्यम ठरणाऱ्या आहेत. त्यांना औषध निर्मितीपेक्षा भारतासारख्या देशातून औषध आयात करणे कमी खर्चाचे असेल म्हणून  त्यांनी तो पर्याय स्वीकारला असावा. त्यामुळे त्यांच्या कंपन्यांवर भार न टाकता भारतासारख्या देशाला क्वचित प्रसंगी धमकावून सुद्धा गरजेप्रमाणे पुरवठा मागवू शकतात.

  हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषधाबद्दल बोलायचे झाल्यास हे औषध काही विशिष्ट प्रकारचे संधिवात आणि मलेरियासाठी क्लोरोक्वीन हे मुख्यतः वापरले जाते. हे औषध अजून तरी कोरोनावर प्रभावकारी असल्याचे निश्चित स्वरूपात पुढे आलेले नाही. कोरोना रुग्णाशी संपर्क असलेले डॉक्टर, नर्स, घरातील व्यक्ती,पोलीस, सफाई कर्मचारी प्रतिबंधक उपाय म्हणून या औषधाचा वापर करू शकतात अशी सूचना आहे. मात्र त्यातही मनाने आणि वैद्यकीय सल्ल्याशिवाय सेवन करणे चुकीचे आहे. असे केल्यास त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात असेही ते म्हणाले. 

Web Title: ... thats why America does not make hydroxychloroquine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.