शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

माकडाच्या हातात काकडा दिला की हेच होणार, शेतकरी संघटना नेत्यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 04:25 IST

‘माकडाच्या हातात काकडा’ दिला की असेच होणार, अशी तिखट प्रतिक्रिया महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या विधानाबाबत प्रतिक्रिया देताना व्यक्त केली आहे.

कोल्हापूर : ‘माकडाच्या हातात काकडा’ दिला की असेच होणार, अशी तिखट प्रतिक्रिया महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या विधानाबाबत प्रतिक्रिया देताना व्यक्त केली आहे. बुधवारी कोल्हापुरातील कार्यक्रमात ‘सुकाणू समिती सुकलेली आहे’ अशा शब्दांत खोत यांनी खिल्ली उडविली आहे. खोत यांच्या या विधानाबाबत बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजूशेट्टी यांनी अतिशय मोजकी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, माणसाची जागा बदलली की तोंडातील भाषाही बदलते. यंदाचा ऊस दर कुठे ठरणार हे भविष्यकाळात खोत यांना समजेल. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील म्हणाले, ‘माकडाच्या हातात काकडा दिला की तो काय पराक्रम करतो, अशातला हा खोतांचा प्रकार आहे.’ भाजपाला विनाशकाले विपरित बुद्धी झाल्याने केवळ संघटना फोडण्यासाठी त्यांनी खोतांना जवळ घेतले आहे. पायाखाली काय जळतेय याचे भान न ठेवता खोत बोलत आहेत. त्याची फळे त्यांना भोगावी लागतील.सुकाणू समितीचे समन्वयक अजित नवले म्हणाले, दर मेळाव्यात ठरू नये हे खरे आहे. मात्र, जर तो ज्यांनी ठरवायचा ते ठरवत नसतील तर मेळावा घेऊन आणि रस्त्यावर उतरूनच तो ठरवावा लागेल. सदाभाऊ खोत यांना याचा अनुभव आहे. सत्तेला शरण जाणाºयांनी संघटनेच्या प्रकृतीबाबत बोलण्याची गरज नाही. शेतक-यांच्या पोरांनी काढलेली ही संघटना सुकलेली आहे की बाळसे धरलेली आहे हे येणाºया कालावधीत घडणाºया रस्त्यांवरच्या आंदोलनातून ठरणार आहे.आज ३०० पोलीस ठाण्यांवर मोर्चारघुनाथदादा पाटील म्हणाले, शुक्रवारी बलिप्रतिपदा आहे. बळीचा सण आहे. राज्यातील ३०० पोलीस ठाण्यांवर मोर्चा नेला जाणार आहे.विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणा-या विद्यमान मुख्यमंत्र्यांविरोधात ३०२, ४२० आणि ३०६ कलमानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार