शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

ती वेळ पुन्हा यायला हवी; एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे वादावर छगन भुजबळांचे भावनिक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 18:49 IST

शिवसेना एकत्र असली पाहिजे, राहिली पाहिजे, गावगावातल्या शिवसैनिकांचे काय? शिवसेना संपावी असे कोणत्याही मराठी माणसाला वाटणार नाही. शिवसैनिकाच्या रक्तात सेना आहे, त्यामुळे तो सेनेपासून दूर जाऊ शकत नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.

बाळासाहेब ठाकरेंना अटक झाली, तेव्हा माझे त्यांना अटक न करण्याचे आदेश होते. 2008 मध्ये सुभाष देसाई आणि संजय राऊत असे तीघे जण आलेले, केस संबंधी चर्चा करण्यासाठी. कोर्टात साहेब केस मागे घेतो म्हणाले. जज बोलले की काय करत आहात तुम्ही, ती केस काढली गेली. असेच एक वादळ आताही  उठलेय. ते कधीतरी शांत होईल, मग एकमेकांचे आवाज ऐकू येतील, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी आणखी एक अपेक्षा व्यक्त केली. 

शिवसेना एकत्र असली पाहिजे, राहिली पाहिजे, गावगावातल्या शिवसैनिकांचे काय? शिवसेना संपावी असे कोणत्याही मराठी माणसाला वाटणार नाही. शिवसैनिकाच्या रक्तात सेना आहे, त्यामुळे तो सेनेपासून दूर जाऊ शकत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मंडल आयोगावरून मतभेद झाल्यावर मी बाहेर पडलो होतो. तत्कालीन कमिशनरांना मी  बाळासाहेबांना अटक करायची नाही असे सांगितले होते. अटक झाल्य़ावर त्यांना जामीन मिळत असेल तर मिळू द्या, आडकाठी आणू नका असे आदेश दिले होते, असा खुलासा भुजबळ यांनी केला. 

केस संपल्यावर उद्धव यांनी निरोप दिला की तुम्हाला चहाला बोलावले आहे. नंतर काही दिवसांनी आम्ही सहपरिवार मातोश्रीवर गेलो आणि आमचे पाहिल्यासारखे प्रेम राहिले. आमचे वादविवाद आहेत, भांडणे होती नाही असे नाही. आताचे मुख्यमंत्री माझ्या शेजारी बसायचे. मला असे वाटते की आमचे भांडण जोरदार होते, पण एक वेळ आली की बाळासाहेबांनी मला माफ केले, ती वेळ पुन्हा यायला हवी, अशी आशा भुजबळ यांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत व्यक्त केली. 

ठाकरेंचे मंत्रिमंडळ आले तेव्हा 2 वर्षे कोरोना होता. कार्यकर्ते सुद्धा घरी होते. 2 वर्षे कुणी कुणाला भेटले नाही, हे नाकारू शकत नाही. ओबीसी आरक्षणाविषयी फडणवीस यांच्याशी बोललो आहे, भाटिया कमिशनने अहवाल दिलाय. शेवटच्या टप्प्यात शिंदे व फडणवीस यांच्यावर हे काम गेलंय, आता अपेक्षा आहे की असा निर्णय व्हावा की देशभरातील ओबीसी ना आरक्षण मिळावे, असेही भुजबळ म्हणाले. 

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना