शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांवर बोजा मालमत्ताकरवाढीचा

By admin | Updated: March 31, 2017 04:01 IST

महापालिका निवडणुकीत ५०० चौ.फू. क्षेत्रफळाच्या मालमत्ताधारकांना करमाफीची घोषणा करणाऱ्या शिवसेनेने आपल्या

ठाणे : महापालिका निवडणुकीत ५०० चौ.फू. क्षेत्रफळाच्या मालमत्ताधारकांना करमाफीची घोषणा करणाऱ्या शिवसेनेने आपल्या घोषणेपासून घूमजाव करीत मालमत्ताकरात १० टक्के वाढ प्रस्तावित केली. यामुळे ठाणेकरांवर सुमारे ८० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ९०० कोटींची वाढ दर्शवणारा ३ हजार ३९० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी महासभेसमोर सादर केला. मालमत्ताकरात वाढ प्रस्तावित करताना अनेक विकासकामे करण्याची हमी आयुक्तांनी दिली आहे.२०१७-१८ च्या जमाखर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक महासभेसमोर सादर करताना आयुक्त जयस्वाल यांनी विकासाबाबतचे त्यांचे धोरण स्पष्ट केले. अर्थसंकल्प ३३९०.७८ कोटी रुपयांचा असून त्यामध्ये महापालिकेचे उत्पन्न २३३३.९२ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहे. अनुदाने २३२.८६ कोटी रुपये, तर कर्ज, कर्जरोख्यांपासून ५३५ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. आरंभीची शिल्लक २८९ कोटी रुपये असून महसुली खर्च १५६२.८२ कोटी रुपये, तर भांडवली खर्च १८२७.७२ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आला आहे. २४ लाख रुपये शिलकीचा हा अर्थसंकल्प गतवर्षीच्या तुलनेत ९०७.५७ कोटींनी जास्त आहे. मालमत्ताकरांमध्ये १० टककयांची वाढ प्रस्तावित करताना, वर्षभराचा कर ३१ मेपूर्वी एकरकमी भरणाऱ्या ठाणेकरांना सामान्य करात १० टक्के सूट देऊ केली आहे. (प्रतिनिधी)