ठाणे/मुंबई : कधी ऊन तर कधी मळभ अशा सातत्याने बदणाऱ्या वातावरणाने हैराण असणाऱ्या मुंबई आणि ठाणेकरांना डेंग्यूनंतर आता मलेरियानेही विळखा घातला आहे. नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत या दोन्ही महानगरांमध्ये डेंग्यू-मलेरियासह विविध आजारांनी फणफणलेल्या रुग्णांची संख्या तब्बल सात हजारांच्या घरात गेली आहे. मुंबईत नोव्हेंबरच्या दोन आठवड्यांमध्ये ८१ डेंग्यूचे रुग्ण आढळले. मलेरियाच्या रुग्णांतही नोव्हेंबरमध्ये वाढ झाली असून, याच काळात मलेरियाचे ४४८ रुग्ण आढळले आहेत. ठाणे शहरात डेंग्यूचे ९६ रुग्ण आढळले असून, त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत तब्बल १,६८२ जणांना मलेरियाची लागण झाली आहे.
ठाणे, मुंबईकरांना डेंग्यूनंतर आता मलेरियाचा विळखा
By admin | Updated: November 20, 2014 04:01 IST