शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
4
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
5
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
6
USA vs CAN : वर्ल्ड कपचा श्रीगणेशा! कॅनडा विरूद्ध अमेरिका म्हणजे IND vs PAK, जाणून घ्या कारण
7
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
8
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
9
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
10
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
11
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
12
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
13
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
14
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
15
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
16
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
17
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
18
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी
19
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
20
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर

ठाणे हत्याकांड - हसनैन बहिणींच्या अंगाला हात लावून ‘वेगळया पद्धतीने वागायचा

By admin | Published: March 05, 2016 10:08 PM

स्वत: संशयी वृत्तीचा असलेला हसनैन हा मानसिकदृष्टया अपरिपक्व असलेल्या बत्तूल (३०) बरोबर लैंगिक चाळे करायचा. शिवाय, इतर बहिणींशीही त्याचे वर्तन चांगले नव्हते

- विचित्र वर्तुणूकीमुळेच त्याचे लवकर लग्न लावण्यात आले होते- कुवैतला जाण्यासाठी वडीलांकडे ४५ लाखांची मागणीजितेंद्र कालेकरठाणे : स्वत: संशयी वृत्तीचा असलेला हसनैन हा मानसिकदृष्टया अपरिपक्व असलेल्या बत्तूल (३०) बरोबर लैंगिक चाळे करायचा. शिवाय, इतर बहिणींशीही त्याचे वर्तन चांगले नव्हते. तो त्यांच्या अंगचटीला जाऊन ‘वेगळया पद्धतीने वागायचा’ त्याच्या याच वर्तनामुळे आईने त्याचे लग्नही लवकर केले होते. ही घटना घडली त्यादिवशी आईने अक्षरश: त्याच्याकडे ठार न करण्यासाठी विनवणी केली. त्यावेळी ‘मैं सबको मारके मै भी फासी लटकने वाला हूँ, असे सांगून त्याने आई आणि बहिण बत्तूल यांच्या मानेवर वार करुन त्यांना ठार केल्याची महत्वपूर्ण माहिती या घटनेची एकमेव साक्षीदार आणि आरोपी हसनैनची बहिण सुबिया हिने पोलिसांना दिली आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हसनैन हा मानसिकदृष्टया अपंग असलेल्या बत्तूलशी अनेकदा ‘गंधी हरकते’ करायचा, असे तिने सांगितले होते. याशिवाय, हे सर्व समजल्यानंतर बत्तूल बरोबर तिची आई कायम सावलीसारखी असायची. पण, केवळ बत्तूलच नाहीतर हसनेनला आम्हा बहिणींबरोबर स्पर्श करीत ‘वेगळया पद्धतीने वागण्याची हसी मजाक करण्याची सवय होती. त्याचे हेच वागणे आईला खटकत होते. त्यामुळेच तिने त्याचे लग्न लवकर केले. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचे असे वागणे सुरु होते. वयाने मोठा असतांनाही त्याचे ‘असे’ वागणे आईला आवडत नव्हते. ज्यादिवशी ही घटना घडली, त्यादिवशी २७ फेब्रुवारी रोजी जेवण झाल्यानंतर सर्वच जण गाढ झोपी गेले. त्यामुळे खाल्लेल्या अन्नात आणि शितपेयात गुंगीचे औषध मिसळल्याचा ठाम विश्वास असल्याचा दावाही तिने केला आहे.तो नेहमी कुवैतला जायचे असल्याचे सांगायचा. वेगळा व्यवसाय करण्यासाठी वडीलांकडे त्याने ४५ लाखांची मागणी केली होती. सुबियाच्या लग्नाच्या वेळीही त्याने पाच लाखांचे कर्ज काढले होते. तर आईच्या माहेरच्या मालमत्तेतून मावशी आणि आईच्या वाटयाला आलेले ३० लाख रुपये देखिल त्याने घेतले होते. कर्जबाजारी झाल्याने प्रचंड चिडचिडा आणि रागीट झाल्याने त्याला या कोणत्याच पैशांबाबत कोणीही विचारणा करीत नव्हते. आनंदनगर येथील त्याच्या नावावर असलेल्या झोपडया विकून त्याचे पैसेही आणून द्या, त्या पैशातून माझे कर्ज फेडतो, असेही त्याने वडील अन्वर यांना सांगितले होते. परंतु, झोपडया जमिनीसह नावावर झाल्यास जादा पैसे मिळतील आणि त्यातून मुलींनाही हिस्सा देता येईल, असा वडीलांचा विचार होता. परंतु, मुलींसाठीच विचार करता, असे सांगून वडीलांशी त्याचा नेहमी वाद सुरु असायचा असेही सुबियाने म्हटले आहे. त्यातूनच वडवलीतील राहते घरही विकून पैसे घेण्यासाठी त्याला वडीलांनी सांगितले होते. परंतु, ते घर आईचे वडील गुलजार यांच्याकडून मिळाले होते आणि ते शोएब वरेकर यांच्या नावावर असल्यामुळे त्याला ते विकता आले नव्हते. हसनेनने त्याच्या लग्नापूर्वी कुर्बानीसाठी दोन चाकू आणले होते. तेंव्हा बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीचा चाकू हातात घेऊन तो उलटा माझ्या गळयाला लावून तू एक फटकेकी है, आणि बत्तूल दो फटकेकी है असे तो बोलत असे. मात्र, आम्ही ते मनावर घेतले नव्हते. त्यानंतरही ‘मेरे सरपे खून सवार है, असे तो बोलत असे. त्यावेळी ‘कुर्बानी आयेगी तो बकरे काट’ असा सल्ला आईने त्याला दिल्याचेही सुबियाने पोलिसांना सांगितले. .........................................२० फेब्रुवारीलाच दिले होते दावतचे आमंत्रण२० फेब्रुवारी रोजी कासारवडवली येथे मुलीला पोलिओ डोस पाजण्यासाठी आले होते, तेंव्हाच हसनैनने पुढच्या शनिवारी दावत ला येण्याचे आमंण दिले होते. त्यावेळीही त्याने नव्यानेच घेतलेल्या ओव्हनमध्ये चिकन बनविले होते. आपल्या नकारानंतर मात्र २७ फेब्रुवारी रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास तो घरी घेण्यासाठी आला होता. तेंव्हा दीर शेहबाज आणि जावेने त्याच्याबरोबर जाण्याचा आग्रह केला. हसनैनकडे ठेवलेले सोन्याचे दागिने येतांना घेऊन येते, असे सासू सलमा यांना सांगून त्यादिवशी दावतला गेल्याचे तिने सांगितले...............................................बत्तूलच्या आवाजाने जाग आली....त्यादिवशी जेवणानंतर पहाटे १.३० नंतर सर्व झोपी गेले. अंथरुणावर पडल्यानंतर मलाही गाढ झोप लागली. पण काही वेळातच बत्तुल हिचा ‘अल्ला अम्मी अल्ला अम्मी’ असा मोठयाने ओरडण्याचा आवाज आल्यावर जागी झाले. त्यावेळी हसनैनचे आईने पाय पकडले होते. त्यावेळी ‘ मैने तेरेको जनम दिया है, मेरे को मत मार , अशी जीवाची अक्षरश: भीक मागत होती. पण डोक्यात सैतान शिरलेल्या भावाने ‘मै सबको मारके मै भी फासी लटकने वाला हॅू,’ असे आईला बजावले. त्यानंतर मला उचलून बाथरुमकडे फेकले आणि ‘तेरेको तडपा तडपा के मारुंगा, असे धमकावले. त्यावेळी उधर देख सादिया हिलती है, असे म्हणून मी त्याचे लक्ष विचलीत केले. तो तिकडे वळला आणि पटकन आतून कडी लावून घेतली. त्यानंतर मदतीसाठी चाचीकडे धावा केला, असेही तिने सांगितले.........................................