ठाणे : मध्य रेल्वेच्या ठाणे - कल्याण डाऊन धीम्या मार्गासह हार्बरच्या सीएसटी - कुर्ला आणि वडाळारोड - माहिम मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक स. ११ ते दु. ३.३०या वेळेत घेण्यात येणार असून त्या कालावधीत मुलुंडपर्यंत धीम्या डाऊन मार्गावरुन येणार्या लोकल त्यानंतर डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. त्या वेळेत कळवा ते ठाकुर्ली या धीम्या मार्गावरील फलाटांमधील वाहतूक ठप्प राहणार असल्याचे जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले. परिणामी कळवा,मुंब्रा, दिवा, कोपर, ठाकुर्लीच्या प्रवाशांनी डाऊन मार्गे कल्याण-डोंबिवली येऊन त्यानंतर अप मार्गे जात अपेक्षित ठिकाणी जावे, असे आवाहनही रेल्वे प्रशासनाने केले आहे. हार्बर मार्गावरील ब्लॉकमुळेही पनवेल - नेरुळ स्थानकांदरम्यान अप/डाऊन दोन्ही मार्गावरील लोकल सेवा ब्लॉकच्या कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत. ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलसेवाही स. ११.१९ ते दु. ३.१९ या कालावधीत ठाणे ते पनवेल आणि पनवेल ते नेरुळ मार्गावर रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल -अंधेरी लोकल सेवाही रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी सीएसटी - नेरुळ तसेच ट्रान्स हार्बरच्या ठाणे - नेरूळ मार्गावर विशेष लोकल सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
ठाणे-कल्याण डाऊनला ब्रेक मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक ; हार्बरच्या पनवेल-नेरूळ मार्गावर लोकल बंद
By admin | Updated: May 17, 2014 21:58 IST