नशेचे इंजेक्शन देऊन एका २१ वर्षीय तरुणीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पीडिताच्या दोन मैत्रीणींसह एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
पीडित मुलगी ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथे तिच्या आजीसोबत राहते आणि कल्याणमधील एका कंपनीत काम करते. दरम्यान, १९ मार्च रोजी आजीशी झालेल्या वादानंतर ती टिटवाळ्यात राहणाऱ्या मैत्रिणीच्या घरी राहण्यासाठी गेली. पीडिताची दुसरी मैत्रीणीही त्याच परिसरात राहते. एक आठवड्यानंतर पीडिताने आजीकडे परतण्याचा निर्णय घेतला. मैत्रिणीने तिच्या ओळखीच्या एका पुरुषाला फोन केला आणि पीडिताला तिच्या घरी सोडण्यास सांगितले. तो व्यक्ती कार घेऊन आला, ज्यात अगोदरच चार जण होती. पीडितासोबत तिच्या दोन्ही मैत्रीणीही कारमध्ये बसल्या. त्यांनी पाडिताला घरी सोडण्याऐवजी कल्याण येथील एका कंपनीत घेऊन गेले.
चाळीचे बांधकाम पाहण्यासाठी जातोय असे सांगितले आणि...पीडिताने याबद्दल विचारले असता, कार चालकाने चाळीचे बांधकाम पाहण्यासाठी जात आहे आणि त्यानंतर तिला घरी सोडतील असे सांगितले. त्यानंतर त्यांनी पीडिताला एका खोलीत घेऊन गेले आणि नशेचे इंजेक्शन दिले. ज्यामुळे ती बेशुद्ध पडली. चार दिवसांनी शुद्धीवर आल्यानंतर तिने स्वत:ला घराच्या शौचालयात नग्न अवस्थेत पाहून हादरली. आपल्यावर अत्याचार झाल्याचे तिच्या लक्षात आले. पीडितांनी जाब विचारला असता त्यांनी या घटनेबद्दल कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पीडिता घरी परतली आणि तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार आजीला सांगितला.
अद्याप कोणालाही अटक नाहीपीडिताच्या आजीने ताबडतोब टिटवाळा पोलीस ठाणे गाठून तिच्या दोन मैत्रिणी आणि पाच पुरुषांविरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी सात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७०, ६४(२)(एम), १२३ , ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणातील सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.