शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री आवास योजनेत ठाणे जिल्हा राज्यात पहिला, कल्याण, भिवंडी, शहापूरची कामगिरी सर्वोत्तम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 16:55 IST

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा प्रधानमंत्री आवास योजनेत ठाणे जिल्ह्याने ( ग्रामीण ) राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

ठाणे :  केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा प्रधानमंत्री आवास योजनेत ठाणे जिल्ह्याने ( ग्रामीण ) राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पहिल्या दोन तालुक्यांमध्ये कल्याण आणि भिवंडी या तालुक्यांचा समावेश आहे. तसेच मोठ्या प्रमाणात संख्येनुसार घरकुले पूर्ण करणाऱ्या राज्यातील पहिल्या दहा तालुक्यांमध्ये शहापूर तालुक्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे.

या कामगिरीची दखल घेऊन घरकुल राज्य व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून राज्याचे ग्रामविकास सचिव असीम गुप्ता यांच्या हस्ते ठाणे जिल्हा परिषदेला गौरविले जाणार आहे. हा गौरव १ सप्टेंबर २०१८ रोजी सिडको भवन सभागृह सीबीडी बेलापूर येथे होणार आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते यांनी दिली.

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत असणाऱ्या शबरी, रमाई, आदिम आदी घरकुल योजना या केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या विभागाच्या माध्यमातून या योजना राबवल्या  जातात. या योजनेंतर्गत सन २०१६-१७ वर्षाकरिता जिल्ह्याला ३ हजार ३९९  लक्षांक दिले होते. त्यापैकी ३  हजार १४६ पूर्ण करण्यात आले. सन २०१७- १८ करिता ७७४ एवढे लक्षांक दिले होते. त्यापैकी ५२१ घरकुल बांधण्यात आली. तर २०१८- १९ करिता ४६२ लक्षांक देण्यात आला असून त्यापैकी ४४३ घरांना मंजुरी मिळाली आहे. यंदाच्या वर्षाचा पहिला हप्ता देखील लाभार्थ्यांना देण्यात आलेला आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्ह्याने केलेली कामगिरी कौतुकास्पद असून  शासनाने दिलेला लक्षांक पूर्ण करण्यासाठी सर्वच यंत्रणा तत्परतेने काम करत आहेत. सन २०१७-१८ वर्षाचा संपूर्ण लक्षांक ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी सगळ्या यंत्रणा सज्ज असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले.  

टॅग्स :Homeघर