शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र आव्हाड यांचे बॉडीगार्ड, कुक, कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण; ठाणे जिल्ह्यात २३७ बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 12:41 IST

ठाण्यात आता कम्युनिटी स्प्रेड पध्दतीने कोरोना बाधीतांची संख्या वाढू लागल्याचे दिसून आले आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे पोलीस बॉडीगार्ड, कुक, कार्यकर्ते अशा तब्बल १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. तर जिल्ह्यात आज नव्या ५१ रुग्णांची भर पडली आहे. त्यात एकट्या ठाणे शहरात २८ नव्या रुग्णांची भर मागील २४ तासात पडली आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रु ग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ठाण्यात मागील २४ तासात तब्बल २८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील एका दिवसात कोरोनाबाधित रु ग्णांच्या संख्येत ४८ ने वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट अधिकच गडद होत आहे. मागील २४ तासात ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक २८ नविन कोरोनाबाधित रु ग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही ४६ वरुन थेट ७४ वर गेली आहे. यामध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडील बॉडीगार्ड, कुक, कार्यकर्ते अशा तब्बल १४ जणांचा त्यात समावेश असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. तर, नवी मुंबई आणि मीरा भार्इंदर पालिकाक्षेत्रात प्रत्येकी ११ नवीन रु ग्ण आढळून आले असून कल्याणमध्ये एक असे ५१ नवीन रु ग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रु ग्णांची संख्या २३७ वर पोहोचली आहे.                                  ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहे. अनेक खासगी रु ग्णालये ताब्यात घेवून कोरोना रु ग्णांसाठी आरक्षित करून ठेवण्यात येत आहे. नागरिकांना घरा बाहेर न पडण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. तरी देखील नारीकांकडून भाजी मार्केट, घाऊक बाजार पेठांमध्ये गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना आजाराबत गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यात सोमवारी एका दिवसात तब्बल ५१ नवीन कोरोनाबाधित रु ग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रु ग्णांची आकडेवारी हि २३७ वर पोहोचली असून आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक ठाणे महानगर पालिका क्षेत्रात सर्वाधिक २८ नवीन रुग्ण आढळून आल्यामुळे कोरोनाबाधित रु ग्णांची संख्या ७४ वर पोहोचली आहे. यामध्ये गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे असलेले बॉडीगार्ड, कुक आणि काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मारहाण प्रकरणी ताब्यात घेतलेल्या सहापैकी दोघा कार्यकर्त्यांचेही रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. अशा एकूण तब्बल १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुसरीकडे ढोकाळी, आझाद नगर, चरई, कासारवडवली, वाघबीळ, कौसा, विटावा, खारेगाव, शांतीनगर, रघुनाथ नगर, महाराष्टÑ नगर (वागळे), गांधी नगर, गार्डन इस्टेट या भागतही कोरोनाचेरुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये २५ पुरुष आणि तीन महिला समावेश असून एका दिवसात तब्बल २८ नव्या रुग्णांची भर ठाण्यात पडली आहे. तर ठाणे नगरच्या चार पोलिसांना क्वॉरन्टाइन करण्यात आले आहे. त्या पाठोपाठ कल्याणमध्ये एक रु ग्ण आढळून आला असून तेथील संख्या ५६ झाली आहे. तर, नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ११ नव्या रु ग्णांची नोंद झाल्यामुळे तेथील रु ग्णाच्या आकडा ५० वर पोहोचला, मीरा भार्इंदर मध्ये देखील सोमवारी ११ रु ग्णांची नोंद झाल्यामुळे तेठील्कोरोनाबाधीतांची संख्या ४७ वर पोहोचली आहे. तर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी आणि ठाणे ग्रामीण क्षेत्रात सोमवारी एकही नवीन रु ग्ण आढळून आला नसल्याची माहिती जिल्हा रूग्णालय प्रशासनाने दिली.                        दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई या तीन महापालिकेतील रु ग्णांच्या संख्येने पन्नासी पार केली आहे. तर, मीरा भार्इंदर महापालिका पन्नासी च्या काठावर येवून पोहोचली आहे. त्यात जिल्ह्यातील महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाने आपले बस्तान बांधण्यास सुरु वात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट गडद होत असल्याचे दिसून येत आहे.                   

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याJitendra Awhadजितेंद्र आव्हाड