शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार शिवाजी पार्क; शिवसेनेच्या शिंदे गटाची माघार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 06:58 IST

शिवसेनेच्या शिंदे गटाच्या या भूमिकेमुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क नेमके कोणाला मिळणार हा वाद संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.

सावंतवाडी/मुंबई : आम्ही सहानुभूतीचे राजकारण करत नाही. विकासाचे राजकारण करतो. त्यामुळेच वादात न जाता शिवाजी पार्कऐवजी दुसरे मैदान आम्ही घेतले आहे. ठाकरे गट स्वत:च राजकारण करतो आणि स्वत:च प्रसिद्धी मिळवतो हे आता जनतेने ओळखावे, असा टोला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लगावला. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

शिवसेनेच्या शिंदे गटाच्या या भूमिकेमुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क नेमके कोणाला मिळणार हा वाद संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या शिंदे गटाने पालिकेला अजून कळविले नसल्याने शिवाजी पार्क कोणत्या शिवसेनेला द्यायचे याबाबत अजूनही पालिका प्रशासन संभ्रमात आहे. याबाबत दोन दिवसांत निर्णय होईल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. शिवसेना नेते अनिल परब यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी विभाग अधिकाऱ्यांची भेट घेतली असता दोन दिवसांत निर्णय घेऊ, असे सांगण्यात आले. याच मुद्द्यावर आज, मंगळवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेणार आहेत.

शिवसेनाएकनाथ शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांनी शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केले होते. मात्र, मागील वर्षीप्रमाणे यंदाही प्रशासनाने तत्काळ निर्णय घेण्याचे टाळले. पहिला अर्ज कोणाचा आला त्याबाबत दोन्ही गटांनी गुप्तता पाळली आहे. 

दुसरे मैदान घेतल्याचा दावाकाय आहे नियम?- शिवाजी पार्क वर्षातील ३६५ दिवसांपैकी ४५ दिवस राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी देता येते. यापैकी ९ दिवस शिवाजी पार्क कोणाला द्यायचे, याचा अधिकार राज्य सरकारचा आहे. - उरलेले ३६ दिवस मैदान कोणाला द्यायचे, याचा निर्णय घेण्याचा अधिकार पालिकेला आहे. दसरा मेळाव्यासाठी कोणताही राजकीय पक्ष अथवा संस्था अर्ज करू शकते.- मात्र, पालिकेच्या निकषानुसार मैदानासाठी जी संस्था अथवा राजकीय पक्ष प्रथम अर्ज करते, त्याला प्रथम प्राधान्य देण्यात येते. अर्ज करणाऱ्याचा मागील काही वर्षांचा इतिहास तपासला जातो. - मागील वर्षी जर एखाद्या संस्थेला अथवा राजकीय पक्षाला मैदान दिले असेल, तर यावर्षी ते मैदान प्राधान्याने त्या संस्थेला मिळू शकते.

शिवाजी पार्क कुणाला द्यायचे यावरून गेल्यावर्षी राजकीय दबावाखाली पालिकेने टाळाटाळ केल्याचा आरोप करीत ठाकरे गटाने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. अखेर न्यायालयाने प्रशासकीय चूक लक्षात आणून दिल्यानंतर ठाकरे गटाला मैदान मिळाले होते. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारण