शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

घोडेबाजारांचा आरोप गाढवांनी करू नये: उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 04:02 IST

मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक फोडल्यानंतरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपालाच लक्ष्य केले आहे. शिवसेनेने तीन कोटी रुपये देऊन नगरसेवक फोडल्याचा

विशेष प्रतिनिधी मुंबई : मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक फोडल्यानंतरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपालाच लक्ष्य केले आहे. शिवसेनेने तीन कोटी रुपये देऊन नगरसेवक फोडल्याचा आरोप करणारे भाजपाचे खासदार किरिट सोमय्या यांना, ‘घोडेबाजाराचा आरोप गाढवांनी करू नये’ असा टोला ठाकरे यांनी हाणला.दिवसभराच्या नाट्यमय घडामोडीनंतर मनसेतून आलेल्या सहा नगरसेवकांच्या उपस्थितीत ठाकरे यांची सायंकाळी मातोश्रीवर पत्र परिषद झाली. ठाकरे यांचा सगळा रोख हा भाजपावर होता. भांडुपच्या पोटनिवडणुकीत भाजपा जिंकल्यानंतर आता मुंबई महापालिकेत भाजपाचा महापौर आणण्याच्या हालचाली सुरू झाल्याच्या बातम्या येत असतानाच मनसेचे सहा नगरसेवक फोडून ठाकरे यांनी आपली मांड पक्की करीत भाजपाला प्रत्युत्तर दिले. एका दिवसात कायदेशीर प्रक्रिया करून आम्ही सहा नगरसेवकांना आणले त्यावरून आमच्या ताकदीचा अंदाज आला असेलच, असा सूचक इशाराही ठाकरे यांनी दिला.नांदेडमध्ये शिवसेनेचे आमदार प्रताप चिखलीकर यांना गळाशी लावणाºया भाजपावर शिवसेनेच्या मुखपत्रातून सडकून टीका करण्यात आली आहे.मात्र, आपण मनसे फोडून तेच करीत आहात याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता ठाकरे पुन्हा भाजपावर बरसत म्हणाले की, त्यांनी केली ती खुद्दारी आणि आमची गद्दारी का? फोडाफोडीच्या आरोपांवर कोणाला फटका द्यायचा म्हणून नगरसेवकांना शिवसेनेत घेतलेले नाही, त्यांनीच सेना प्रवेशाची इच्छा व्यक्त केली. ते स्वगृही परतल्याचा आम्हाला आनंद आहे.मराठी माणसाची ताकद दाखवणारशिवसेनेत आलेले मनसेचे नगरसेवक दिलिप लांडे यावेळी म्हणाले की, मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही शिवसेनेत आलो आहोत. मुंबईत शिवसेनेच्या मराठी महापौराला हटविण्याच्या हालचाली भाजपाने सुरू केल्याने मराठी माणसाची ताकद दाखविण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाKirit Somaiyaकिरीट सोमय्या