शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक उपद्रवाबद्दल ठाकरेंवर गुन्हा नोंदवावा, उच्च न्यायालयात जनहित याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 11:46 IST

एकनाथ शिंदे व अन्य बंडखोर नेत्यांवरून पत्रकार परिषदा, दौरे व राज्यातील ठिकठिकाणी भेटी देण्यास ठाकरे व राऊत यांना मनाई करावी, अशी मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी दाखल केली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी  सार्वजनिक उपद्रव केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा व या प्रकरणाचा तपास करण्यात यावा, अशी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.एकनाथ शिंदे व अन्य बंडखोर नेत्यांवरून पत्रकार परिषदा, दौरे व राज्यातील ठिकठिकाणी भेटी देण्यास ठाकरे व राऊत यांना मनाई करावी, अशी मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी दाखल केली आहे. राजकीय पेचप्रसंगांनंतर ठाकरे व राऊत यांनी धमक्या दिल्यानंतर बंडखोर नेते सुरक्षिततेसाठी गुवाहाटीला पळून गेले, असे पाटील यांनी याचिकेत म्हटले आहे. बंडखोर आमदारांच्या विरोधात राज्यातील विविध जिल्ह्यांत शिवसैनिकांनी निदर्शने करण्यास सुरुवात केल्याने सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाला, असा आरोप केला आहे.पाटील यांनी याचिकेत म्हटले आहे की, राज्यात दंगल आणि हिंसाचाराची परिस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिकांना वाटत आहे. ठाकरे व राऊत यांच्या दबावामुळे आणि चिथावणीमुळे राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. पोलिसांच्या उपस्थितीत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले आणि कायदा व सुव्यवस्थेचा भंग करण्यात आला. केंद्र सरकारने बंडखोर आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. याचाच अर्थ, राज्यात शांततेचा भंग झाला आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून गुन्हा नोंदविण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना द्यावेत, अशीही मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेCourtन्यायालय