शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

ठाकरे, शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा, उद्धव ठाकरेंचे बंडखोरी करणाऱ्यांना थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 06:49 IST

Uddhav Thackeray: ठाकरे आणि शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा असे थेट आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना दिले आहे.

मुंबई : ठाकरे आणि शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा असे थेट आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना दिले आहे. काही जण म्हणत होते की मेलो तरी शिवसेना सोडणार नाही. आज तेच पळून गेले. मला या सगळ्या आरोपांचा वीट आला आहे. ही वीट ठेवून चालणार नाही. तर अशा लोकांच्या डोक्यावर हाणणार आहे असा इशाराही त्यांनी दिला.

ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना जिल्हाप्रमुखांशी ऑनलाइन संवाद साधला. बंडखोर आमदारांसंदर्भात ते म्हणाले की, तुम्हाला हवे आहेत तितके आमदार घेऊन जा. पण जोपर्यंत बाळासाहेबांनी रुजवलेली मुळे आहेत तोपर्यंत शिवसेना संपणार नाही. जे सोडून गेले ते माझे कधीच नव्हते. मूळ शिवसेना माझ्यासोबत आहे. ज्यांना आपण मोठे केले त्यांची स्वप्ने मोठी झाली. ती मी पूर्ण करू शकत नाही. त्यांनी जावे.

सध्या जे चालले आहे तो भाजपचा डाव आहे. मी वर्षा निवासस्थान सोडले म्हणजे मोह सोडला, जिद्द सोडलेली नाही. स्वप्नातही या पदावर जाईन असा कधी विचार केला नव्हता. त्या पदाचा कधीच मोह मला नव्हता. एकनाथ शिंदेंसोबत काही आमदार गुजरातला गेल्यानंतर काही आमदारांना बोलाविण्यात आले होते. यावेळी काही झाले तरी सोडणार नाही असे ते म्हणाले. दादा भुसे, संजय राठोड शब्द देऊनही निघून गेले. अशा लोकांचे करायचे काय अशी विचारणाही उद्धव ठाकरे यांनी केली.

भाजपासोबत जावे यासाठी माझ्यावर काही आमदारांचा दबाव आहे. माझ्या कुटुंबावर, मातोश्रीवर घाणेरडे आरोप करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून मी कधीच बसणार नाही. मी शांत आहे पण षंढ नाही, असेही ते म्हणाले.

आता आदित्यही बडवा आहे का?आपण प्रत्येक वेळी यांना महत्त्वाची खाती दिली. नगरविकास नेहमी मुख्यमंत्र्यांकडे असते पण ते मी यांना दिले. माझ्याकडे साधीच खाती ठेवली. आधी यांच्यासाठी बाळासाहेब विठ्ठल होते आणि मी बडवा होतो. आता मी विठ्ठल आहे आणि आदित्य बडवा आहे का? यांच्या मुलाला खासदार केले मग माझ्या मुलाने काहीच करायचे नाही का?      - उद्धव ठाकरे

पक्षप्रमुखपदही सोडायला तयार म्हणत झाले भावुक...जो कोणी समोर येईल त्याच्यावर मी विश्वास ठेवेन. शिवसेनेचा पहिला नारळ फुटला होता तशीच परिस्थिती आहे असे समजा, असे आवाहनही त्यांनी केले. तुम्हाला जिथे भवितव्य दिसत असेल तिथे खुशाल जा मी थांबवणार नाही. तुम्हाला वाटत असेल तर सांगा मी आनंदाने शिवसेना पक्षप्रमुखपद सोडायला तयार असल्याचे सांगताना ते भावुक झाले.

स्वत:ची किंमत लावून गेले त्यांना किती किंमत द्यावी?स्वत:ची किंमत लावून तिकडे गेलेल्यांना किती किंमत द्यायची अशी बोचरी टीका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर केली. मित्रपक्षांनी धोका दिला नाही पण आम्ही ज्यांना मोठे केले त्यांनी धोका दिला. शिवसेना पक्षप्रमुखांना कोरोना असताना त्यांनी धोका दिला. आयपीएलचे ऑक्शन होते तसे यांचे तिकडे झाले की काय असा सवालही आदित्य यांनी केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण