शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

...तर श्रीराम तुमचा धनुष्यबाणाने वध करेल; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 11:19 IST

आज ड्रग्जचा रावण महाराष्ट्रातून संपवायचा आहे. आम्ही ते संपवू मग जे व्हायचंय ते होऊन जाऊ द्या असं संजय राऊतांनी म्हटलं.

मुंबई – ड्रग्जचा रावण आजूबाजूला फिरतोय आणि श्रीरामाची बात तुम्ही करता, आधी रावण संपवा. ड्रग्जच्या रावणाला संपवा मग श्रीरामाचे नाव घ्या. ड्रग्जचे हफ्ते राज्यकर्त्यांपर्यंत जातायेत. ड्रग्जचा व्यापार करण्यासाठी राजकीय यंत्रणांना वापरलं जातेय. ड्रग्जमाफियांना तुरुंगातून पळवून लावलं जातंय. काय सांगतायेत, देवेंद्र फडणवीस, जय श्रीरामची घोषणा द्या. श्रीराम तुमचा धनुष्यबाणाने वध करेल अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर केली आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, आज रावणाला जाळण्याचा दिवस आहे. रावण हा विद्वान शिवभक्त होता. पण अत्यंत अहंकारी होता. अहंकाराने त्याचा नाश झाला. राम सत्याचे प्रतिक होता, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही श्रीरामाच्या सत्याचे प्रतिक आहे आणि महाराष्ट्र आणि दिल्लीत जो अहंकार समोर दिसतोय त्याचा नाश केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. शिवसेनेचा दसरा मेळावा आज आहे. तो त्यासाठीच आहे. पुढील दिशा देणारा, अहंकाराचा नाश होईल. २०२४ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे दिल्ली आणि महाराष्ट्रातील राज्यकर्ते व्यासपीठावर बसलेले असतील हे तुम्हाला खात्रीने सांगतो असं त्यांनी म्हटलं.

त्याचसोबत गुजरातमधून ड्रग्ज कसं येतं, कुणाच्या संरक्षणात येते? पोलीस, गृहमंत्रालय कुणाकडे आहे? महाराष्ट्रातील ड्रग्जच्या रावणाचा अंत करावा लागेल. उडता पंजाब, उडता गुजरातनंतर आता उडता महाराष्ट्र करायचा आहे का? महाराष्ट्राला केनिया, नायजेरियाच्या दिशेने घेऊन जायचंय का? सर्वात मोठं ड्रग्ज व्यापाराचं हब बनवायचं का? इथले उद्योग गुजरातला पळवायचे आणि महाराष्ट्रात ड्रग्ज पाठवायचे. हे महाराष्ट्राला संपवण्यासाठी कट रचला जातोय असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केला आहे.

प्रत्येक बच्चा जय श्रीराम बोलेल, पण तुमचं ड्रग्ज घेऊन नाही

आज ड्रग्जचा रावण महाराष्ट्रातून संपवायचा आहे. आम्ही ते संपवू मग जे व्हायचंय ते होऊन जाऊ द्या. देवेंद्र फडणवीसांना कंठ फुटला आहे. मी जबाबदारीनं बोलतोय, गरब्याला फिरत असतात. त्यांनी गर्जना केली, देश का बच्चा बच्चा श्रीराम बोलेगा, मग याआधी कधी बोलत नव्हता. मग जी मुले श्रीराम बोलतायेत, त्यांच्याकडे रावणाकडून ड्रग्ज पोहचलं जातंय ते बंद करा. पंचवटी रामाची, त्याठिकाणीच सगळ्यात जास्त ड्रग्जचा व्यापार सुरू आहे. पैठण तीर्थक्षेत्र तिथे २५०-३०० कोटींचे ड्रग्ज सापडले. नागपूरमध्ये ड्रग्ज मिळतायेत, पुणे-मुंबईत हजारो कोटींचा ड्रग्ज व्यवसाय सुरू आहे. मग बच्चा बच्चा जय श्रीराम काय बोलतायेत, ते श्रीराम बोलतील पण तुमचं ड्रग्ज घेऊन नाही असंही राऊतांनी म्हटलं.

पुढचा दसरा मेळावा होणार नाही

शिवसेना एकच आहे, दसरा मेळावाही एक आहेत. मेळावे खूप असतात, शरद पवार, पंकजा मुंडे, मोहन भागवत असे मेळावे आहेत. बागडा जरा मोठ्याने बांग देतो. नपुंसक असतो तो जरा जास्त कांदे खातो. आझाद मैदानात बाळासाहेबांसमोर फोटो लावलेत. चेहरा पाहिला तर पोटात कळ आल्यासारखा आहे. बाळासाहेबांसोबत फोटो लावताय, आमचीही कधी हिंमत झाली नाही. उद्धव ठाकरेंनीही लावले नाहीत. आम्ही शिवसेनेचे मालक नाही तर विश्वस्त आहोत. ही फडफड शेवटची आहे. तुमचा पुढचा दसरा मेळावा होणार नाही. हे डुप्लिकेट आहेत असं सांगत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर प्रहार केला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेDrugsअमली पदार्थ