शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

"XXX हा बोलीभाषेतील शब्द, मी देतो ती शिवी नव्हे तर उद्रेक"; संजय राऊत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 10:38 IST

गेल्या अनेक वर्षात ३ वेळा असा प्रसंग घडला आहे. मी प्रत्येक नेत्याच्या भाषणाची उदाहरणे देऊ शकतो. गरज म्हणून त्या भाषेचा, शब्दाचा वापर करतो. याचा अर्थ आम्ही शिवराळ आहे असं होत नाही.

मुंबई - मी एकदा किरीट सोमय्यांना XXX म्हटलं, हा बोली भाषेतला शब्द आहे. तुम्ही डिक्शनरी काढून पाहा चुXX या शब्दाचा अर्थ काय? महाराष्ट्रात, यूपीत रोज वापरतात. हा शब्द असंसदीय नाही. संसदेची भाषा वेगळी आहे. आमच्यासारखे लोक जे लोकांचे नेतृत्व करतात त्यांची भाषा वेगळी असते. मी सरसकट हे शब्द वापरत नाही. ज्याला जी भाषा कळते त्याला ती वापरली जाते. विंचवाला चपलेनेच चिरडावं लागते. हाताने, फुंकर मारून मारले जात नाही असं सांगत खासदार संजय राऊतांनी शिवराळ भाषेचं समर्थन केले आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, लोकशाहीत आक्षेप घेतला जाऊ शकतो. मी शिवीगाळ करतो असं म्हटलं गेले. राज्यातील जनता मला ओळखते, गेली ४०-४५ वर्ष सातत्याने लिखाण करणारा माणूस आहे. माझ्या लिखाणात मी कधीही अशाप्रकारे भाषेचा वापर केला नाही. माझी भाषा स्पष्ट, परखड असते. संस्कृती सोडून भाषा वापरली नाही. गरजेनुसार भाषेचा टोन कमी जास्त असेल. शिवीला माझा आक्षेप नाही. संत साहित्यातही शिव्या खूप आहेत. जनाबाईंचा अभंग आहे "अरे विठया विठया। मूळ मायेच्या कारटया, तुझी रांड रंडकी झाली, जन्मसावित्री चुडा ल्याली" असे अनेक अभंग माझ्या मुखात आहे. मी संत साहित्याचासुद्धा अभ्यासक आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत नामदेव ढसाळ आणि मी अनेक वर्ष एकत्र राहिलो आहे. ढसाळांचे साहित्य वाचा, ज्याला तुम्ही विद्रोही साहित्य म्हणता. भावना, उद्रेक आहेत. विद्रोह आहे. मी त्याला शिवी म्हणत नाही. भावनांचा उद्रेक आहे. मी त्याचे समर्थन करणार नाही. माझ्या भाषेत मी कायम संयमच ठेवला. गेली २० वर्ष मी संसदेत खासदार आहे. कितीवेळा असा प्रसंग आला मी शिवीगाळ केली? मी शिव्यांचे स्पष्टीकरण देऊ शकतो. मी ३ वेळा शिवी दिलीय. निवडणूक आयोगाला दिलेली शिवी ही ठरवून दिली होती. कारण ती लोकभावना होती. ज्यापद्धतीने निवडणूक आयोगाने निकाल विकला. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ज्यारितीने उचलून दुसऱ्याच्या हाती दिली हा लोकभावनेचा उद्रेक आहे. मी कशाला अख्खा महाराष्ट्र शिव्या घालतोय असं संजय राऊतांनी म्हटलं. 

आम्ही असभ्य आहोत का? गेल्या अनेक वर्षात ३ वेळा असा प्रसंग घडला आहे. मी प्रत्येक नेत्याच्या भाषणाची उदाहरणे देऊ शकतो. गरज म्हणून त्या भाषेचा, शब्दाचा वापर करतो. याचा अर्थ आम्ही शिवराळ आहे असं होत नाही. शिवसेना ही रस्त्यावरची संघटना आहे. शिवसेनेबाबत जे घडलं त्यामुळे जी भाषा वापरतो हा विद्रोह आहे. आम्ही असभ्य आहोत का? महाराष्ट्राचे संस्कार, संस्कृती, मराठी भाषा, साहित्य आणि कला हे आम्हालाही माहिती आहे. विंचू डंस करत असेल तर त्याला चपलेनेच मारावे लागतात असंही राऊत यांनी सांगितले. 

तर आम्ही सार्वजनिक जीवनात आहोत. निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला तो शिवसेनेवर आणि महाराष्ट्रावर अन्याय करणारा आहे. हा निकाला दबावातून दिला आहे. त्यामुळे त्यांना दिलेली भाषा योग्यच आहे. मी माझ्या शब्दावरून मागे हटत नाही. ज्याच्यावर संकट येते त्याला कळते. निवडणूक आयोग हा भ्रष्ट आयोग आहे असं लोकांना वाटते. निवडणूक आयोगाचे काम योग्यरितीने चालले नाही हे सुप्रीम कोर्टाच्याही निदर्शनास आले. ४० आमदार फुटले म्हणून अख्खा पक्ष फुटिरांच्या हातात ठेवला नसता. माझ्यादृष्टीने मी जो शब्द वापरला ते योग्यच आहे. मी घटनाबाह्य वागणाऱ्या संस्थेला शिवी दिली हा उद्रेक आहे. शिवीगाळ नाही असं स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग