शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “झुकेगा नही घुसेगा साला, हा डायलॉग भारीच होता, पण...”; सुषमा अंधारेंचा फडणवीसांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 12:42 IST

Maharashtra News: देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिले.

Maharashtra Politics: ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गट आक्रमक झाला असून, शिंदे गटासह भाजपवर सडकून टीका केली. याला भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी टीकेला उत्तर देताना केलेल्या विधानांवरून आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करून पलटवार केला आहे. 

राहुल गांधी सावरकरांचा अपमान करतात आणि उद्धव ठाकरे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. काय होतास तू, काय झालास तू, असा कसा वाया गेलास तू ? उद्धव मला फडतूस गृहमंत्री म्हणतात, मात्र मी फडतूस नाही काडतुस आहे. झुकेगा नही तो घुसेगा, या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. यावरून आता सुषमा अंधारे यांनी पलटवार केला. 

झुकेगा नही घुसेगा साला, हा डायलॉग भारीच होता, पण...

"झुकेगा नही घुसेगा साला" हा डायलॉग भारीच होता पण 2016 पासून तुमच्या घरात एक बाई घुसली आणि तुमच्याच पत्नी वर स्पायिंग करत होती हे तुम्हाला 7वर्षे कळले नाही आणि तुम्ही घुसायच्या बाता कराव्यात हे काय पटत नाही राव !!, असे ट्विट सुषमा अंधारे यांनी केले आहे. 

दरम्यान, तुम्ही ठाकरे परिवारातील सदस्याला काय म्हणालात, कोणत्या शब्दात बोललात, ते महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. ईडी, सीबीआय भाजपाचे बॉडीगार्ड आहे. ईडी, सीबीआय बाजूला ठेवा, मग काडतूसचा अर्थ सांगतो. तुमचे काडतूस भिजलेले आहे, ते उडत नाही. तुम्ही झुकेगा नही, म्हणताय, मात्र तुम्ही झुकलेलेच आहात. शिंदेसोबत काम करायला लागणे म्हणजे झुकणेच आहे. ज्याला नीट वाचता येत नाही, अशा व्यक्तीसोबत तुम्ही काम करताय, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस