शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

ठाकरे गटाला पुन्हा धक्का! अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदेसेनेत; उपमुख्यमंत्र्यांची टोलेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 21:27 IST

Shiv Sena Shinde Group News: विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद अशा निवडणुकांमध्ये महायुतीला विजयी करायचे आहे, असा निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवला.

Shiv Sena Shinde Group News: २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा मोठा पराभव झाला. यानंतर आता ठाकरे गटाकडून मुंबईसह अन्य महापालिका निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. यातच ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत आहेत. ठाकरे गटातील नेते, पदाधिकारी यांची गळती सुरूच आहे. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील अनेक नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. 

ठाकरे गटाच्या तसेच महाविकास आघाडीतील  ठाणे, भिवंडी, शहापूर, पालघर, अहिल्यानगर, अकोला, सोलापूर, वाडा, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर अशा अनेक ठिकाणच्या अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलीच टोलेबाजी केली. ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आप अशा सगळ्याच पक्षांनी आता एकच रस्ता धरला आहे आणि तो म्हणजेच धनुष्यबाणाची शिवसेना. बा‌ळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा विचाराचा हा धनुष्यबाण आहे. या शिवसेनेत कुणीही मालक आणि नोकर नसून ही शिवसेना कार्यकर्त्यांची आहे, असे उपमुख्यमंमत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. 

आता महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांत महायुतीचा भगवा फडकवायचा आहे

विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद अशा निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा फडकवायचा आहे, असा निर्धारही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलून दाखवला. काहीजण म्हणत होते की, सुप्रीम कोर्ट झाले आता जनतेच्या न्यायालयात जाऊ. विधानसभा निवडणुकीत खरी शिवसेना कुणाची हे जनतेने ठरवले. काही जणांना स्वप्न पडले होते. त्यांनी मंत्रिमंडळही तयार केले होते. हॉटेलही बुक केले होते. पण, जनतेने आणि लाडक्या बहिणींनी त्यांचे बुकिंग रद्द केले, असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, अडीच वर्षांपूर्वी बाळासाहेबांच्या विचाराचे सरकार स्थापन केले. विकासाबरोबरच कल्याणकारी योजना राबविल्या. यामु‌‌ळे महायुतीचा बहुमताने विजय झाला. लाडकी बहीण, भाऊ, शेतकरी, युवक, ज्येष्ठ अशा सर्वांनी भरभरून मतांचा वर्षाव केला आणि मी सांगत होतो, त्याप्रमाणे विरोधक चीतपट झाले. 

दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि मी असे आम्ही दोघे दोनशे आमदार निवडून आणू नाही तर गावाला शेती करायला जाऊ. पण आम्ही दोघांनी २३२ आमदार निवडून आणले. निवडणुकीत लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना त्यांची जागा दाखवली आणि घरी बसणाऱ्यांना घरीच बसून टाकले. फेसबुक लाइव्ह करणाऱ्या फेसबुक लाईव्ह करायला पाठवून दिले. राज्यातील २ कोटी ३९ लाख लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ओळख मिळाली असून ती कुठल्याही पदापेक्षा मोठी आहे. सीएम म्हणजे कॉमन मॅन असे मी म्हणायचो. आता उपमुख्यमंत्री असताना डिसीएम म्हणजेच डेडीकेटेड टू कॉमन मॅन, असे मी म्हणतो, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी