शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

दररोज २५ लाख मीटर कापड उत्पादन थांबणार

By admin | Updated: April 22, 2015 00:33 IST

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर कारवाई : नऊ प्रोसेसर्सचा पाणीपुरवठा तोडला; ऐन हंगामातील कारवाईमुळे वस्त्रोद्योगात खळबळ

राजाराम पाटील - इचलकरंजी -शहरातील कापडावर प्रक्रिया करणाऱ्या प्रोसेसर्सवरील कारवाईपाठोपाठ औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर बंदची कारवाई होणार असल्याने येथील वस्त्रोद्योगात खळबळ उडाली आहे. ऐन हंगामात दररोज २५ लाख मीटर कापडाचे उत्पादन ठप्प होण्याची भीती निर्माण झाल्याने उद्योजक हवालदिल झाले आहेत.शहरात असलेल्या ६६ प्रोसेसर्समधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्राथमिक प्रक्रिया करून ते पाणी औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात (सीईटीपी) नेले जाते. तेथे प्रक्रिया करून शुद्ध झालेले पाणी बाहेर सोडले जाते. तर त्यातून निर्माण होणारा ‘स्लज’ नष्ट करण्यासाठी नगर जिल्ह्यात पाठविला जातो. इचलकरंजीतील गेल्या तीन वर्षांच्या सीईटीपीच्या पाण्याचा अहवाल राज्यात अव्वल आहे. याशिवाय अन्य ठिकाणच्या तुलनेत येथील सीईटीपीचा स्लज प्रमाणाने अधिक आहे. असे असतानाही येथील नऊ प्रोसेसर्सवर झालेल्या बंदच्या कारवाईचे उद्योजकांना आश्चर्य वाटत आहे.सीईटीपीतील प्रक्रिया केलेले पाणी शेती, सिंचन, वनीकरणासाठी वापरले पाहिजे. मात्र, येथील सीईटीपीचे पाणी बाहेर ओढ्यात सोडले जाते. त्याबद्दल प्रदूषण नियंत्रण मंडळाने सीईटीपीला १० दिवसांची नोटीस दिली असून, त्याची मुदत पुढील आठवड्यात संपते. परिणामी, सीईटीपी बंद पडल्याने त्यावर अवलंबून असलेले ६६ प्रोसेसर्सही बंद पडणार आहेत. त्यामुळे दररोज २५ लाख मीटर कापडावरील प्रक्रिया ठप्प होणार आहे आणि आपोआपच २५ हजार यंत्रमागही बंद ठेवण्याची वेळ येणार आहे. सध्या यंत्रमाग कापडाच्या विक्रीचा हंगाम जोरदार असतानाच येथील वस्त्रोद्योगावर होणाऱ्या या परिणामामुळे यंत्रमाग व प्रोसेसर्स उद्योजक धास्तावले आहेत.दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या सूचनापत्रानुसार इचलकरंजी नगरपालिकेने शहरातील पाच प्रोसेसर्स कारखान्यांचा नळपाणी पुरवठा तोडला. त्यामध्ये राधा-कन्हैय्या एक इंची, सावंत एक इंची, अरविंद कॉटस्पिन दोन इंची, राधामोहन अर्धा इंची व यशवंत तीन इंची या नळ जोडण्यांचा समावेश आहे. उर्वरित रघुनंदन, लक्ष्मी, हरिहर व डेक्कन या प्रोसेसर्सकडे नळ जोडणी नाही.कोकणात जाणार-अचानकपणे प्रोसेसर्स बंद करण्याच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर काही प्रोसेसर्सधारकांची बैठक स्टेशन रोडवरील एका प्रोसेसर्समध्ये झाली. प्रदूषण मंडळाने हेतूपुरस्सर नऊ प्रोसेसर्सवर कारवाई करताना उच्च न्यायालयातील २३ एप्रिलच्या तारखेचा आधार घेतला व न्यायालयाला काही तरी दाखविण्यासाठी प्रोसेसर्सवर आघात केला, अशी टीका या बैठकीत करण्यात आली. तसेच प्रोसेसर्स कारखाने कोकणात हलविण्याच्या दृष्टीनेही विचार करण्यात आला.अहवाल आणि वर्षानंतर कारवाईप्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रोसेसर्सवरील बंदची कारवाई करण्यासाठी कायदेशीररीत्या असलेली कोणतीही प्रक्रिया राबविली नाही. मंगळवारपासून नऊ प्रोसेसर्स बंद झाल्याने सुमारे १२ लाख मीटर कापडावरील प्रक्रिया ठप्प झाली. तर दोन हजार कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. प्रोसेसर्सवर बंदची थेट कारवाई करताना गतवर्षीच्या ‘निरी’च्या उच्च न्यायालयातील अहवालाकडे बोट दाखविण्यात आल्याने प्रोसेसर्सधारक अस्वस्थ झाले आहेत.