शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

गणितासह भाषेची कसोटी

By admin | Updated: July 5, 2016 01:29 IST

विद्यार्थ्यांची ‘गणित’ आणि ‘भाषा’ या विषयांच्या अभ्यासाची कसोटी लागणार आहे. कारण २४ ते ३० जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना पायाभूत चाचणीला सामोरे जावे लागणार

मुंबई : विद्यार्थ्यांची ‘गणित’ आणि ‘भाषा’ या विषयांच्या अभ्यासाची कसोटी लागणार आहे. कारण २४ ते ३० जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना पायाभूत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत ही पायाभूत चाचणी घेण्यात येणार असून, इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही चाचणी असणार आहे.विद्यार्थ्यांचे ‘गणित’ आणि ‘भाषा’ हे विषय कितपत पक्के आहेत? याचा आढावा याद्वारे लेखी स्वरूपात घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे राज्यातील खासगी, अनुदानित, विना-अनुदानित, अल्पसंख्याक शाळांना पायाभूत चाचणी घेणे बंधनकारक राहणार आहे. यंदा महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे राज्यभरातील शाळांना प्रश्नपत्रिका पुरविल्या जाणार असून, शाळेने २४ ते ३० जुलै या कालावधीत ही चाचणी घेणे अनिवार्य असणार आहे. गणित आणि भाषा विषयांवर आधारित ही चाचणी आहे. विद्यार्थ्यांना या विषयातील कितपत ज्ञान आहे, हे पाहण्यासाठी चाचणी घेतली जाते. या चाचणीतून विद्यार्थ्यांचा त्या विषयातील अभ्यास कितपत आहे ते कळते. (प्रतिनिधी)इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यार्थी अभ्यास करणार नाहीत अशी भीती पालकांना होती. या पायाभूत चाचणीमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची एक प्रकारे उजळणीच होणार आहे.- विद्या चव्हाण, पालकपायाभूत चाचणी परीक्षेचा फायदाच झाला आहे. मुलांना गणित आणि भाषा विषयाचे ज्ञान आहे की नाही? हे शिक्षकांसोबत पालकांनासुद्धा कळते. या चाचणीसाठी विद्यार्थ्यांना विशेष अभ्यास करावा लागत नाही, अगदी साध्या-सोप्या आणि झालेल्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा असते. याचा विद्यार्थ्यांना फायदाच होतो.- स्मिता बटा, पालकगेल्या वर्षी सहावीच्या विद्यार्थ्यांना तीन अंकी संख्येची बेरीज; असे प्रश्न विचारण्यात आले होते. सहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्तेप्रमाणे प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. त्यानुसार प्रश्नपत्रिका तयार कराव्यात. तरच या प्रकल्पाचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. शिवाय पायाभूत चाचणीत ‘ड’ श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी काही विशेष तरतुदी कराव्यात.- अनिता विचारे, शिक्षिका, पराग विद्यालय