शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

वारक-यांना देण्यात येणा-या ताडपत्रीतही गैरव्यवहार

By admin | Updated: June 15, 2017 19:48 IST

भ्रष्टाचारमुक्ततेच्या नारा देणा-या भारतीय जनता पक्षाच्या सतेतही पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार होत असल्याचे प्रकरण आज उघडकीस आले.

ऑनलाइन लोकमत

पिंपरी-चिंचवड, दि.15 - भ्रष्टाचारमुक्ततेच्या नारा देणा-या भारतीय जनता पक्षाच्या सतेतही पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार होत असल्याचे प्रकरण आज उघडकीस आले. आषाढीवारीत वारकºयांना देण्यात येणाºया ताडपत्रीतही गैरव्यवहार झाला आहे. बाजापेठेत २४०० रूपयांना मिळणारी ताडपत्री ३४१२ रूपयांना खरेदी करून २२ लाखांच्या निविदेत सुमारे साडेसहा लाखांचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे. दरपृथकरण आणि निकोप स्पर्धा न करताच निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्याची चौकशी करावी,  बाजारभावापेक्षा अधिक दराने खरेदी करून जनतेच्या पैशाची लूट करणाºयांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांनी केली आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आषाढीवारीतील दिंडीप्रमुखांना वस्तू भेट दिली जाते. गेल्यावर्षी विठ्ठल रूक्मिणी मूर्ती खरेदीत गैरव्यवहार केल्याचा कांगावा एका तथाकथीत भविष्याचा वेध घेणाºया वर्तमान पत्राने केला होता. त्यास भारतीय जनता पक्षाने हवा दिली होती. यामुद्यावरून राष्टÑवादी काँग्रेसला कोंडीत पकडून भाजपाने राळ उठविली होती. चौकशी समितीच्या अहवालात कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार झाला नसून केवळ अनियमितता झाल्याचे उघड झाले होते. मात्र, हा भावनिक मुद्दा गाजल्याने यामुद्यावरून महापालिकेतील सत्ता राष्टÑवादीला गमवावी लागली होती. भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर पारदर्शक कारभार करू, असे अभिवचन शहरवासियांना दिले होते. मात्र, आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर वारक-यांना देण्यात येणाºया ताडपत्रीत गैरव्यवहार केल्याचा पुरावा राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना, मनसेच्या नेत्यांनी माध्यमांसमोर सादर केला.
 
महापालिकेच्या वतीने दिंडी प्रमुखांना वस्तू भेट देण्यात येते. यावर्षी ताडपत्री भेट देण्याचे ठरले. त्यानंतर शंभर टक्के वॉटर प्रुफ, नऊ बाय पंधरा अशी १३५ चौरस फुट साईज, कॅनव्हास केमीकल प्रोसेस, आयएसआय मार्किंग असे स्पेसीफिकेशन देण्यात आले होते. एकुण ६५० ताडपत्री घेण्यासाठी पहिली निविदा २६ मे रोजी प्रसिद्ध केली. तीची मुदत सात दिवसांची होती. त्यात एकही ठेकेदार आला नाही. त्यानंतर २ जूनला दुसºयांचा निवीदा प्रसिद्ध झाली. त्यात एक जणाने निविदा सादर केली. त्यानंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. त्यावेळी रेखा इंजिनियरिंग, सिद्धी कॉपीयर्स, एमपीइंजिनियरिंग, धर्मे इंटरप्रायजेस, माणिकचंद हाऊस अशा पाच जणांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी अधिकृत वितरकाचे प्रमाणपत्र नाही, असे सांगून तिन ठेकेदारांना अपात्र ठरविण्यात आले. त्यापैकी सिद्धी कॉपीयसने ३४१२ रूपये त्यापैकी सिद्धी कॉपीयसने ३४१२ रूपये आणि धर्मे इंटरप्रायजेसने ३६०० रूपये प्रति ताडपत्री असा दर दिला होता. त्यामुळे कमी दराची निविदा म्हणून सिद्धी कॉपीयर्सला काम देण्यात आल्याचे भांडारविभागाने सांगितले. 
 
कमी दर देऊनही अपात्र-
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेससह, शिवसेना, मनसेने ताडपत्री खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध करण्यासाठी निविदा प्रक्रियेतील एका ठेकेदारालाच माध्यमांसमोर हजर केले. माणिकचंद हाऊसचे संदीप माळी म्हणाले, ‘‘मी तिन वेळा निविदा भरली होती. याबाबत भांडार विभागात विचारायला गेल्यानंतर तेथील अधिकाºयांनी माहिती दिली नाही. टाळाटाळ करीत आहेत. मी संबंधित ताडपत्रीसाठी २४०० रूपये दर दिला होता. मात्र, माझी निविदा मंजूर केली नाही. मला अनामत रक्कमही परत दिली नाही.’’
राजीनामा द्या-
विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले, ‘‘मूर्ती खरेदीत भ्रष्टाचार झाला नसतानाही भाजपाने कांगावा केला होता. वारकºयांच्या ताडपत्रीत गैरव्यवहार केल्याचा आता जनतेला पुरावाच दिला आहे. तसेच निविदा प्रक्रियेत निकोप स्पर्धा झाली नाही. तसेच दरपृथकरणही झाले नाही.  कुठे गेला पारदर्शक कारभार. मूर्ती खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा कांगावा करणाºया भाजपाच्या नेत्यांनी जबाबदारी स्विकारून  राजीनामा द्यायला हवा. तसेच दोषींवर कारवाई करू.’’
प्रति ताडपत्री मागे एक हजारांचा गैरव्यवहार-
बाजारात २४०० रूपयांपर्यंत मिळणारी ताडपत्री भाजपाने ३४१२ रूपयांना खरेदी केली आहे. ६५० ताडपत्री खरेदी करण्यात येणार होत्या. वाढीव दरानुसार २२ लाख १७ हजार ८०० रूपये खर्च अपेक्षीत होता. तर बाजारभावानुसार २४०० रूपये दर अपेक्षीत धरल्यास १५ लाख ६० हजार रूपये खर्च अपेक्षीत होता. सुमारे सहा लाख ५७ हजार आठशे रूपयांचा गैरव्यहार झाल्याचे निश्चित झाले आहे.