शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

तेंदुपत्ता व्यवसायाचा ३०० काेटींचा पल्ला! मागील वर्षीच्या तुलनेत भाव अधिक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 11:51 IST

कोरोनाकाळातील दोन वर्षांच्या विस्कळीतपणानंतर यावर्षी गडचिरोली जिल्ह्यातील तेंदूपत्ता व्यवसाय सुरळीत झाला आहे.

गडचिराेली :कोरोनाकाळातील दोन वर्षांच्या विस्कळीतपणानंतर यावर्षी गडचिरोली जिल्ह्यातील तेंदूपत्ता व्यवसाय सुरळीत झाला आहे. विशेष म्हणजे यावर्षी तेंदूपत्त्याच्या व्यवसायात ३०० काेटींच्या वर उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

कोरोनानंतर सावरला तेंदुपत्ता1. गेली दोन वर्षे काेराेना साथीमुळे या व्यवसायाला मोठा फटका बसला होता. राष्ट्रीय बाजारपेठेतही तेंदूपत्त्याचा तुटवडा निर्माण झाला हाेता. परिणामी ज्या व्यापाऱ्यांकडे जुना तेंदूपत्ता शिल्लक हाेता, त्याला दामदुप्पट भाव मिळाला. 2. यावर्षी काेराेनाचे संकट नसल्याने जवळपास सर्वच ग्रामसभांचा तेंदूपत्ता विकला गेला. बहुतांश ग्रामसभांना प्रति स्टँडर्ड बॅग (एक हजार तेंदूपत्ता पुडे) १० हजार रुपयांपेक्षा अधिक भाव मिळाला.  

वनविभागाला १२ काेटींचा महसूल- वनविभागाकडे तेंदूपत्त्याचे  केवळ ३० युनिट - या युनिटमधून ४१ हजार ३४५ स्टँडर्ड बॅग तेंदूपत्ता संकलन - यातून वनविभागाला ११ काेटी ८० लाख ३१ हजार रुपयांची राॅयल्टी मिळाली 

पावसानेही दिली साथ  तेंदूपत्त्याचा व्यवसाय जवळपास मे महिन्याचा पहिला आठवडा ते जून महिन्याचा पहिला आठवडा या कालावधीपर्यंत चालताे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तेंदूपत्त्याची उचल करून गाेदामामध्ये साठवणूक केली जाते. या कालावधीत पाऊस झाल्यास तेंदूपत्ता भिजून माेठे नुकसान हाेते. मात्र यावर्षी अजूनपर्यंत पाऊस आला नसल्याने नुकसान टळले आहे.गडचिराेलीच्या तेंदुपत्त्याला विशेष पसंतीराज्यात गाेंदिया, चंद्रपूरसह तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांमध्येसुद्धा तेंदूपत्त्याचे संकलन केले जाते. मात्र गडचिराेली जिल्ह्यातील एटापल्ली, भामरागड, सिराेंचा, धानाेरा या तालुक्यांमधील तेंदूपत्ता आकाराने माेठा आहे. तसेच दर्जा अतिशय चांगला आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यांमधील व्यापारी तेंदूपत्ता संकलनासाठी गडचिराेली जिल्ह्यात येतात.

टॅग्स :businessव्यवसाय