दिलीप दहेलकर, गडचिरोलीनक्षलवाद्यांना कोट्यवधी रुपये तसेच दारूगोळा उपलब्ध करून देणारे साधन असलेला तेंदूपत्ता व्यवसाय आता कंत्राटदाराच्या हातून ग्रामपंचायतीच्या हातात जाण्याची चिन्हे आहेत. गडचिरोलीसह राज्याच्या ११ जिल्ह्यांत ‘पेसा’ची (पंचायत (एक्स्टेन्शन टू दि शेड्युल्ड एरियाज्) अॅक्ट) अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे पेसा अंतर्गत येत असलेल्या या गावांमधील गा व्यवसाय ग्रामपंचायतीकडे देण्यात येणार आहे.राज्यात सर्वाधिक ७८ टक्के जंगल गडचिरोली जिल्ह्यात आहे. आलापल्ली, गडचिरोली, वडसा, भामरागड, सिरोंचा या संपूर्ण वनविभागात मिळून १६० तेंदू युनिट आहेत. या युनिटचा लिलाव वनविभागाच्या माध्यमातून यापूर्वी केला जात होता. यातील बहुतांश युनिट आंध्र प्रदेशातील विडी व्यापारी घेत होते. तसेच चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांतील स्थानिक व्यापाऱ्यांचीही मोठी मक्तेदारी होती. हजारो मजुरांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत होता.आता पेसा कायदा लागू झाल्याने गडचिरोली जिल्ह्यातील ११ तालुक्यातील १३८८ ग्रामपंचायतींना तेंदूपत्ता संकलन व विक्रीचे अधिकार मिळणार आहेत. जिल्हा प्रशासनाने संबंधित ग्रामपंचायतींना याबाबत विचारणा केली आहे. आपण तेंदूपत्ता संकलनाचे काम करणार काय, याबाबतचा ठरावही मागितला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून व्यापाऱ्यांच्या माध्यमातून होणारा हा व्यवसाय आता ग्रामसभा पुढाकार घेऊन करणार आहे.
तेंदू व्यवसाय ग्रामसभांच्या हातात
By admin | Updated: November 18, 2014 02:15 IST