शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ : संगीताच्या ‘सर्वत्र-कल्लोळा’तून अभिजात स्वरांच्या शोधाची दहा वर्षे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 06:06 IST

गेल्या दशकभरात ज्या तरुण कलाकारांच्या पाठीवर  ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारा’ची थाप पडली, त्यांची पुरस्कारानंतरची दमदार वाटचाल ही निवड किती कसोशीने केली जाते, याची निदर्शक म्हणता येईल.

संगीत ऐकायचे असेल तर मोगरीच्या सुवासाने घमघमलेल्या मैफलींना जाणे सोडाच, घराबाहेर पाऊलदेखील ठेवायची गरज नाही असा संगीत-कल्लोळ आजूबाजूला माजलेला असताना देशाच्या कानाकोपऱ्यातून अभिजात मूल्य असणारे तरुण दमसासाचे  ‘स्वर’ शोधून त्यांच्या पाठीवर दिग्गजांच्या आशीर्वादाचा हात ठेवण्याची दहा वर्षे... म्हणजेच  ‘सूर ज्योत्स्ना’ या सदाबहार स्वर-मंचाचे पहिले दशक!संगीत हा ज्यांचा श्वास होता अशा स्वर्गीय ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लोकमत वृत्तपत्रसमूहाने निर्मिलेले हे व्यासपीठ गायन-वादनाच्या क्षेत्रातील तरुण प्रतिभेच्या आगमनाची पहिली ललकारी ठरावे, इतक्या नेमकेपणाने कार्यरत आहे. गेल्या दशकभरात ज्या तरुण कलाकारांच्या पाठीवर  ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारा’ची थाप पडली, त्यांची पुरस्कारानंतरची दमदार वाटचाल ही निवड किती कसोशीने केली जाते, याची निदर्शक म्हणता येईल.

ज्याच्या हाती स्मार्टफोन त्याच्या गळ्यात - कानात - हातात संगीत; अशा गजबजलेल्या वर्तमानात रिॲलिटी शो, रील्स आणि सोशल मीडियावरल्या तात्कालिक प्रसिध्दीच्या झगमगाटातून दीर्घकाळाच्या दमसासाची प्रतिभा शोधून काढण्याचे काम करणारे तज्ज्ञ परीक्षक हे  ‘सूर ज्योत्स्ना’ पुरस्कारांच्या नेमकेपणाचे खरे रहस्य! पं. जसराज, पं. हरिप्रसाद चौरासिया, पं. राजन-साजन मिश्रा,  एल. सुब्रमण्यन, पं. हृदयनाथ मंगेशकर, शुभा मुदगल, शंकर महादेवन, अनुराधा पौडवाल, पंकज उधास, कविता कृष्णमूर्ती आदी मान्यवरांनी सूर ज्योत्स्ना पुरस्कारांचे मानकरी ठरवण्यात आपला वेळ आणि आपले शब्द खर्ची घातले आहेत. 

ख्यातनाम गायक रूपकुमार आणि सुनाली राठोड, संगीताचे दर्दी शशी व्यास - गौरी यादवाडकर आणि लोकमत समूहाचे अध्यक्ष व माजी खासदार विजय दर्डा यांचे तयार ‘कान’ सतत नव्या आश्वासक स्वरांचा वेध घेत असतात... वर्षभर सतत चालणाऱ्या  या प्रक्रियेतून निवड होते ती अभिजात भारतीय संगीताची परंपरा पुढे नेण्याची सांगितिक समज आणि तयारी असलेल्या तरुण कलावंतांची!- २०२२ च्या पुरस्कार विजेत्यांच्या सन्मानाची संध्याकाळ यावर्षी बहरेल ती येत्या मंगळवारी, २१ मार्च रोजी, मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये!... त्या संध्याकाळी पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या उपस्थितीचा आशीर्वाद असेल आणि शंकर महादेवन यांच्या सळसळत्या ऊर्जेचा जल्लोष!... आणि हो, विजय दर्डा म्हणतात त्याप्रमाणे, त्या संध्याकाळी तिथे स्वर्गीय ज्योत्स्ना दर्डा यांच्या आठवणींची प्रसन्न, सुगंधी फुलेही असतील!

टॅग्स :sur Jyotsna awardसूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार