शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

डिसेंबरपर्यंत गिरणी कामगारांसाठी दहा हजार घरे

By admin | Updated: July 17, 2015 00:07 IST

गिरणी कामगारांसाठी डिसेंबरपर्यंत म्हाडा आणि एमएमआरडीएची १० हजार घरे उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.

मुंबई : गिरणी कामगारांसाठी डिसेंबरपर्यंत म्हाडा आणि एमएमआरडीएची १० हजार घरे उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. एमएमआरडीएमार्फत आणखी ८ हजार ७१0 घरे डिसेंबर २0१६पर्यंत उपलब्ध होणार असल्याचेही ते म्हणाले.घरांच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठ महिन्यांत कोणतीही चर्चा केली नसल्याने संतप्त गिरणी कामगारांनी बुधवारी धडक मोर्चा काढला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी याबाबत विधानसभेत माहिती दिली. ते म्हणाले, गिरणी कामगारांसाठी १९ गिरण्यांच्या ६.८३ हेक्टर जमिनीवर ६ हजार ९२५ सदनिका उपलब्ध झालेल्या आहेत. गिरणी कामगारांची माहिती संकलन करण्याकरीता म्हाडातर्फे दिलेल्या जाहिरातीनुसार गिरणी कामगारांचे एकूण १,४८,०६७ अर्ज प्राप्त झाले. या टप्प्याअंतर्गत पूर्ण करण्यात आलेल्या ६ हजार ९२५ सदनिकांसाठी जुलै २0१२ रोजी सोडत काढली होती. आजपर्यंत ५,६४४ कामगारांना सदनिकांचा प्रत्यक्ष ताबा दिला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.एकूण १ हजार २८१ सदनिकांचा विविध कारणास्तव ताबा देण्यात आला नाही. दुसऱ्या टप्प्याअंतर्गत म्हाडामार्फत ६,७९४ सदनिका ६ गिरण्यांमधील संबंधित गिरणी कामगारांसाठी उपलब्ध होणार असून या ठिकाणी बांधकाम सुरू आहे. तिसऱ्या टप्प्याअंतर्गत १० गिरण्यांच्या जमिनीवर एकूण २,९११ सदनिकांचे बांधकाम प्रस्तावित आहे. दुसऱ्या टप्प्याअंतर्गत डिसेंबरपर्यंत म्हाडाच्या ५,२०० तसेच एमएमआरडीएमार्फत उपलब्ध होणाऱ्या ४,८०० अशा एकूण १० हजार सदनिकांसाठी लॉटरीद्वारे वितरण प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे ते म्हणाले.