Temporary hostels for Maratha students: Revenue Minister Chandrakant Patil | मराठा विद्यार्थ्यांसाठी तात्पुरती वसतिगृहे : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील
मराठा विद्यार्थ्यांसाठी तात्पुरती वसतिगृहे : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

विशेष प्रतिनिधी 
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह सुरू करण्याची कार्यवाही सुरू असून त्याचे बांधकाम होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात भाडेतत्वावर वसतीगृह सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
मराठा मोर्चाच्या मागण्यासंदर्भात स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची दुसरी बैठक मंत्रालयात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. भाडेतत्वावरील वसतीगृहामध्ये पहिल्या टप्प्यात १०० मुले व ५० मुलींसाठीची सोय असावी. आवश्यकतेनुसार ही संख्या नंतर वाढविण्यात यावी, असेही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी सांगितले.
सारथी संस्थेची स्थापना करण्यासंदर्भात अहवाल सहा महिन्याच्या आत देण्याच्या सूचनाही यावेळी पाटील यांच्याकडून देण्यात आल्या.
तसेच कुणबी जात प्रमाणपत्रे देणे, तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण आदी विषयांचाही आढावा घेण्यात आला.


Web Title: Temporary hostels for Maratha students: Revenue Minister Chandrakant Patil
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.