शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चंदनापुरी घाटात 'द बर्निंग टेम्पो'चा थरार; १० वी १२ वीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 09:33 IST

या टेम्पोमधून मध्य प्रदेशातील भोपाळ येथून पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका नेण्यात येत असल्याचे समजले असून या सर्व प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या आहेत.

घारगाव ( जि. अहमदनगर) :  संगमनेर तालुक्यातील पूणे नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आज पहाटे टेम्पोला अचानक भीषण आग लागल्याने द बर्निंग टेम्पो थरार येणाऱ्या - जाणाऱ्या वाहनचालकांनी अनुभवला. महामार्ग पोलिसांनी धाव घेतली असून टेम्पो विझविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. हा टेम्पो भोपाळ वरून पुण्याकडे १० वी व १२ वी च्या प्रश्नपत्रिका घेऊन जात होता.     महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नाशिक - पुणे  महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात हॉटेल साईप्रसादच्या समोर टेम्पो क्रमांक एम. पी . ३६ एच. ०७९५ हा पुण्याकडे जात असताना पाठीमागच्या बाजूने अचानक पेटला. मागच्या बाजूने अचानक आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी सदर टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा केला. चालक मनीष चौरसिया व मॅनेजर रामविलास राजपूत यांनी टेम्पो रस्त्याच्या बाजूला घेऊन आग विझविण्याचे काम सुरू केले. या अचानक लागलेल्या आगीत कोणीही जखमी झालेले नाही. नाशिक - पुणे वाहतूक काही काळासाठी जुन्या घाटातून चालू आहे.

घटनास्थळी घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील,पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख घटनास्थळी हजर होते . संगमनेर नगर परिषद आणि संगमनेर साखर कारखान्याचे अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग विझवली आहे.     महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी हजर होते. या टेम्पोमधून मध्य प्रदेशातील भोपाळ येथून पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका नेण्यात येत असल्याचे समजले असून या सर्व प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी घटनास्थळी पोहचले.