शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रामराज्य आणि प्रभूरामचंद्रांचे मंदिर शीघ्रतेने पूर्ण व्हावे : मोहन भागवत यांचे साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 18:50 IST

दगडूशेठ गणपती मंदिरात येण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती, असे सांगत गणरायाकडे जे मागितले, ते त्यालाच माहित आहे, असेही त्यांनी मिश्किलपणे सांगितले. 

ठळक मुद्देदगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीचे दर्शन

पुणे : महागणपतीच्या आशीर्वादाने रामराज्य प्रस्थापित व्हावे आणि प्रभूरामचंद्रांचे मंदिर शीघ्रपणे व कोणताही उशीर न होता पूर्णत्वास यावे, असे साकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गणरायाचरणी घातले. दगडूशेठ गणपती मंदिरात येण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती, असे सांगत गणरायाकडे जे मागितले, ते त्यालाच माहित आहे, असेही त्यांनी मिश्किलपणे सांगितले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे ट्रस्टच्या १२६ व्या वर्षी मंदिरामध्ये मोहन भागवत यांनी सदिच्छा भेट देत गणरायाची आरती आणि अभिषेक केला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, हेमंत रासने, महेश सुर्यवंशी, सुनिल रासने, डॉ.बाळासाहेब परांजपे, प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, मंगेश सुर्यवंशी, यतीश रासने, उल्हास भट, राजेंद्र घोडके, रा.स्व.संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कार्यवाह महेश करपे, किशोर येनपुरे आदी उपस्थित होते. सकाळी १० वाजता भागवत यांचे गणपती मंदिरात आगमन झाले. मंदिरातील सभामंडपात सुरु असलेल्या अभिषेकादरम्यान त्यांनी गणरायाची सर्वसामान्यांना सुख, शांती, समृद्धी लाभो, अशी प्रार्थना केली. अभिषेकाचे पौरोहित्य करणा-या मिलींद राहुरकर गुरुजांनी केलेल्या मंत्रपठणाला साथ देत भागवत यांनी राममंदिर लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी प्रार्थना केली. त्यानंतर महाआरती व भागवत यांना स्मृतीचिन्ह देऊन ट्रस्टतर्फे सन्मानित करण्यात आले. ट्रस्टचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत गणपती सदन या ट्रस्टच्या इमारतीला भेट देऊन ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहितीही भागवत यांनी घेतली. ------------------श्री विघ्नहर्त्याच्या उपासनेतून कष्ट, विघ्न दूर व्हावेत, संस्कार करावेत अशा प्रकारच्या औचित्यपूर्ण दिशेने चाललेले दगडूशेठ गणपती ट्रस्टचे कार्य पाहून आनंद वाटला. समाजाची धारणा करणारा धर्म हाच आहे. आत्मसाधना व लोकसेवा या दोन्हींचे परिपूृर्ण केंद्र यातून आपले मंदिर बनावे असा लेखी शुभेच्छा संदेश त्यांनी अभिप्राय म्हणून गणपती सदन येथे दिलेल्या भेटीदरम्यान दिला.

टॅग्स :PuneपुणेMohan Bhagwatमोहन भागवतAyodhyaअयोध्याDagdusheth Templeदगडूशेठ मंदिर