शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तेजस ठाकरे यांनी पश्चिम घाटात शोधल्या खेकड्याच्या पाच प्रजाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 09:25 IST

नव्या प्रजातींचा शोध लावण्यात तेजस ठाकरे आणि त्यांच्या सहकारी संशोधकांना यश आले आहे. तेजस यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे.

- संदीप आडनाईककोल्हापूर : ‘घाटियाना’ कुळातील दोन आणि तीन प्रजाती या ‘सह्याद्रीना’ कुळातील अशा खेकड्यांच्या एकूण पाच नव्या प्रजातींचा शोध लागला असून या पाचही प्रजाती पश्चिम घाटातील गोड्या पाण्यात आढळल्या आहेत. या नव्या प्रजातींचा शोध लावण्यात तेजस ठाकरे आणि त्यांच्या सहकारी संशोधकांना यश आले आहे. तेजस यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे.साताऱ्याजवळील कोयना परिसरात आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा घाटामध्ये यापैकी ‘घाटियाना ड्यूरेली’ च्या चार प्रजाती आढळल्या. तर ‘घाटियाना रौक्सी’ ही प्रजात गोवा आणि कर्नाटक राज्यामध्ये सापडली. सह्याद्रीमध्ये आढळणारी प्रजात ही प्रदेशनिष्ठ असून एक प्रजात गोवा तसेच कर्नाटकातील परिसरात आढळली.‘झूलाॅजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ चे संशोधक एस. के. पाटी तसेच ‘ठाकरे वाइल्ड फाउंडेशन’ चे संस्थापक तेजस उद्धव ठाकरे यांनी शोधलेल्या या संशोधनाची माहिती फ्रान्सच्या ‘नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री’ ने प्रकाशित केलेल्या ‘झूसिस्टेमा’ या संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाली आहे. सह्याद्रीमध्ये आढळणाऱ्या प्रदेशनिष्ठ ‘सह्याद्रीना’ कुळातील खेकड्यांच्या प्रजातींची संख्या १० होती. मात्र, या शोधामुळे या कुळातील या प्रजातींची संख्या १३ झाली आहे. ‘आतापर्यंत या कुळातील आठ प्रजाती माहिती होत्या.पश्चिम घाटात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. खेकड्यांच्या या नव्या प्रजातींमुळे गोड्या पाण्यातील जैवविविधतेवर प्रकाश पडला आहे. नामशेष होणाऱ्या प्रजातींसाठी संवर्धनाचे काम करणारे संशोधक जेराल्ड मालकॉम ड्यूरेल यांचे नावे ‘घाटियाना ड्यूरेली’ या खेकड्यांच्या प्रजातीला देण्यात आले आहे.- तेजस ठाकरे, संस्थापक, ठाकरे वाइल्ड फाउंडेशनया आहेत पाच प्रजाती...‘घाटियाना’ कुळातील नव्या प्रजातींचे नामकरण ‘घाटियाना रौक्सी’ आणि ‘घाटियाना ड्यूरेली’  असे करण्यात आले आहे. ‘घाटियाना’ कुळातील खेकड्यांची प्रजात निशाचर असून ती झाडांच्या खोडांमधील छिद्रांमध्ये राहते. ‘सह्याद्रीना’ कुळातील ‘सह्याद्रीना इनोपिनाटा’ ही प्रजात महाबळेश्वरमधील धोबी धबधब्यातून, ‘सह्याद्रीना केशरी’ प्रजात नाशिकच्या ब्रह्मगिरी येथून तर ‘सह्याद्रीना ताम्हिणी’ प्रजात ताम्हिणी घाटामधून शोधण्यात आली आहे.